डॉक्टरांच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात "आपला दवाखाना' व्हेंटिलेटरवर:दवाखान्यात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना हेलपाटे

2 hours ago 1
सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे आपला दवाखाना उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मात्र, एक वर्षानंतरही या दवाखान्याकडे नागरिकांचा कल दिसत नाही. वैद्यकीय सुविधा, जागेचा अभाव असल्याने रुग्ण या ठिकाणी येत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात १४ पैकी १३ तालुक्यात आपला दवाखाना सुरू केला आहे. मात्र, यातील अनेक दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने ते बंदच दिसून येतात. राज्यात शासनाने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आरोग्य योजना सुरू केली आहे. त्यानुसार २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या ठिकाणी एक दवाखाना सुरू करण्यात आला. शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे. आपला दवाखान्यात एकूण १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्राथमिक उपचाराशिवाय येथे अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपला दवाखाना ही आरोग्यदायी योजना सुरू केली असली तरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नसल्यामुळे आपला दवाखाना शोभेची वास्तू ठरत आहे. तिवस्यासह दोन ते तीन तालुक्यातील आपला दवाखाना मागील महिन्यांपासून बंद पडला आहे. तसेच काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. आपलाच दवाखाना आता आपला राहिला नसल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. नागरिकांमध्ये संभ्रम आपला दवाखान्यात योग्य उपचार होत नसून प्रत्येक रुग्णाला एकाच प्रकारची औषधी देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या दवाखान्याकडे पाठ फिरवून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काही दवाखाने बंद ^ जिल्ह्यात सर्व ठिकाणी आपला दवाखाना सुरू आहे. मात्र वैद्यकीय कर्मचारी नसल्यामुळे यातील काही दवाखाने बंद आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे ही पद भरती रखडली होती. आता ती होणार आहे. यामधून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. -डॉ. सुरेश आसोले, डीएचओ.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article