हिंगोलीतील हाणामारी प्रकरणात भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता पिस्टल नेमकी आणली कोठून याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरात किरकोळ कारणावरून शिंदेगट व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. या प्रकरणी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या तरुणांवर चव्हाण यांनी गोळीबार केला. .या प्रकरणात विशाल आठवले याच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर दुसरीकडे चव्हाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात 60 ते 70 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक सुरेश दळवे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या पथकाने आरोपींची धरपकड मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, अमोल देशमुख, विवेक देशमुख, राजू जोजार, विकास जोजार, केशव तनपुरे यांना अटक केली आहे. तर दुसऱ्या गुन्हयात श्रीकांत बांगर, ऋषीकेश जगताप, हनुमान तारे, वैभव तारे, विशाल तारे यांंना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. तर याघटनेत गोळीबारासाठी वापरलेली पिस्टल आणले कोठून याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, जिल्हयात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्ावस ठेऊ नये तर कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)