ढोल ताशांच्या गजरात दुर्गादेवीला निरोप:वरुड शहरात विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण, भाविकांचा सहभाग

2 hours ago 1
वरुड शहरातत जय माता दीचा जयजयकार, ढोल ताशांचा गजर, रंगबेरंगी गुलालाची उधळण करीत जल्लोषात वातावरणात दुर्गा मातेला निरोप देण्यात आला. देवीची विसर्जन मिरवणूक वरुडवासियांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरली. शांततेमध्ये दुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत झाल्याबद्दल वरुड पोलिस व महसुल प्रशासनातर्फे सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. मंगळवारी १५ ऑक्टोबरला सकाळपासूनच शहरातील ४५ दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते दुर्गा मुर्तीच्या विसर्जनात व्यस्त होते. शहरातील मुख्य मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात जंगी विसर्जन मिरवणूक कााढण्यात आली. ढोल ताशाच्या ठेक्यावर तरुणाई ताल धरत होती. विसर्जन मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. मिरवणूक बघण्यासाठी शहरात रस्त्याच्या दुतर्फा जनसागर उसळला होता. शहराच्या मुख्य मार्गांवरून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. शेकदरीसह इतर प्रकाल्पावर दुर्गा मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातील मोठा भाजी बाजार परिसरातील आनंद संस्कृतीक दुर्गा मंडळाने कोणत्याही प्रकारचा जल्लाष, बॅँड बाजा, ताशे न ठेवता दुपारपुर्वीच देवीचे शेकदरी धरणावर विसर्जन केले. नवरात्रोत्सवादरम्यान देणगी स्वरुपात गोळा झालेला निधी एका रुग्णाला भेट म्हणून दिला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी तहसीलदार रवींद्र चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, वरुडचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, शेंदुरजनाघाटचे ठाणेदार दीपक महाडीक, बेनोडाचे ठाणेदार ज्ञानोबा फड, मुख्याधिकारी प्रवीण मानकर, शांतता समिती सदस्य आदींसह नागरिक उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article