‘…तर टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार’, संतोष देशमुखांच्या बंधूंचे वक्तव्य

6 days ago 2

या आरोपीवर (वाल्मीकी कराड) मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं वैयक्तिक आंदोलन सुरू होईल. मी मोबाइल टॉवरवर जाऊन स्वतःला संपवून घेणार, असं वक्तव्य मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या आंदोलनाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

धनंजय देशमुख म्हणाले की, ”संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते हत्या प्रकरण यात काय कनेक्शन, हे सीआयडीने ज्या दिवशी याप्रकरणी पहिली सुनावणी झाली, त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला 15 दिवसांचा पीसीआर दिला होता. आज माझी मागणी अशी आहे की, जर या आरोपीवर (वाल्मीकी कराड) मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं वैयक्तिक आंदोलन सुरू होईल. मी मोबाइल टॉवरवर जाऊन स्वतःला संपूर्ण घेणार. यांचं कारण म्हणजे, या आरोपींना उद्या सोडलं तर, हे माझी हत्या करतील. मला ही अशाच निर्घृण पद्धतीने मारतील. मग माझ्या कुटुंबियांच्या न्याय मागणारं कोणीही नसेल. मी असं केल्यास, माझ्या भावलाही समाधान वाटेल की, आपला भाऊ स्वतः संपला. मात्र अशा (क्रूर) पद्धतीने मारला गेला नाही. उद्या सकाळी 10 वाजता मी मोबाइल टॉवरवर चढून स्वतःला संपूर्ण घेणार.”

धनंजय देशमुख पुढे म्हणाले, ”जर मला न्याय मिळत नसेल, सगळी माहिती मिळत नसेल, या सगळ्यापासून (संतोष देशमुख हत्या प्रकारातील तपासापासून) मला आणि माझ्या कुटुंबियांना दूर ठेवलं जात असेल, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझं कुटुंबीय उद्या हा निर्णय घेतोय. मी गांभीर्यपूर्वक सांगतोय, माझ्या भावासोबत जी गोष्ट झाली, ती उद्या पुन्हा हे करतील. म्हणून माझी ही भूमिका आहे, मी उद्या 10 वाजता आनंदोलना सुरुवात करणार. टॉवरवर जाणार आणि स्वतःला संपवून घेणार.”

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article