तहसीलदारांना वर्षापासून नाही गाडी; नगरपंचायत इमारत जागेसाठी प्रयत्न:येवती पाणीपुरवठा योजनेचा बंद वीजपुरवठा केला सुरू

2 hours ago 1
माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील शपथविधी होण्यापूर्वीच अॅक्शन मोडवर दिसले. माढा तहसील कार्यालयास शुक्रवारी भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेतली. माढा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना शासकीय कामकाजासाठी वाहन नसल्याचे लक्षात येताच आमदार पाटील यांनी वरिष्ठांना फोनवरून संपर्क साधून वाहन पूर्ततेची विनंती केली. आठवड्यात तहसीलदारांना गाडी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. येवती येथून शहराला पाणीपुरवठा होतो. तेथील खंडित केलेले वीजपुरवठा त्यांनी तत्काळ सुरळीत करून घेतला. आमदार अभिजित पाटील निकालानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले होते. ते गुरुवारी रात्री मतदारसंघात परतले. तहसील कार्यालयात आमदार पाटील यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, मुख्याधिकारी नेहा कंठे, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील हेळकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. उसाला ३५०० रुपये दराचा शब्द दिलाय तो पाळणार. कारखान्यावर वाहने लावायला जागा नाही. विरोधक चुकीच्या बातम्या पेरुन अफवा पसरवत आहेत. विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढवताना २५०० रुपये दर देणार सांगितले होते, तो दिला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरसह ऊस दर, नेते शरद पवार यांच्या सभेचा निवडणुकीत फायदा झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर हवे माढा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाची नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे, तेथे भेट दिली. पहिल्या मजल्यावर होणारे दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर कसे करता येईल, याबाबत संबंधितांशी चर्चा केली. खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना त्रास होणार नाही, याची दखल घ्यावी. या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. { माढा नगरपंचायतीच्या नूतन इमारतीच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ घेऊन भेटून जागेबाबत तोडगा काढता येतो का ते पाहू असे ठरले. { वैराग व शेटफळ रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक काढणे, आवश्यक आहे. विविध रस्त्यांची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देण्याची सूचना त्यांनी केली. { शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, खरीप हंगाम दुष्काळ निधीचे किती अनुदान वितरित झाले? याची सविस्तर माहिती घेतली. उर्वरित शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यासंबंधीची माहिती घेतली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article