तासगाव अर्बन बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळFile Photo
Published on
:
27 Nov 2024, 7:02 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:02 am
सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली शहरातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. मध्यरात्री दोघा चोरट्यांनी तासगाव अर्बन बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी त्यांनी बँकेबाहेर असणाऱ्या अलार्मची वायर कट केली होती. त्यानंतर चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी आतील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा वळवून स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु कटावणीच्या साह्याने स्ट्राँग रूम न फुटल्याने चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
परंतु बँकेच्या अलार्म कट केल्याचा मेसेज बँक मॅनेजरला गेल्यानंतर याची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र पोलीस बँकेजवळ पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते. परंतु श्वान बँकेजवळच घुटमळले. चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न करीत असल्याची सर्व घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या चित्रिकरणाचाव्दारे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.