राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया दिली आहे. Pudhari Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:40 am
Updated on
:
28 Nov 2024, 11:40 am
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील, अशी खात्री आहे. मी केडरमधील कार्यकर्ता असल्याने मला मंत्रिपद मिळेल. जिल्ह्यात शिवसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा दिलेले आमदार आहेत. ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद असा फॉर्मुला आहे. माझी ही ३ री टर्म असल्याने पालकमंत्री पद मिळावे, यासाठी आग्रही आहे, असे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आज (दि.२८) येथे सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते (Rajesh Kshirsagar) पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कॉमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल, असे स्पष्ट केल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे.
कोल्हापुरात १० पैकी १० जागा महायुतीच्या येणार, हे मी आधीपासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले की एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. ठाकरे शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे विधान अंबादास दानवे यांनी केले आहे, यावर त्यांच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःची माती करून घेतली आहे, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.
शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व आणि काँग्रेस सोबत जायचे नाही, हे विचार होते. मात्र, उध्दव ठाकरेंनी हे विचार पायदळी तुडवले. म्हणून आम्ही बाजूला झालो. मात्र, या आधी आम्ही त्यांना सांगिते होते की, महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही घेतलेला निर्णय पटलेला नाही. शिवसेना प्रमुखांनी कधीच पद घरात ठेवले नाही. मग त्यांना इतकी गडबड का केली? असा सवाल त्यांनी केली.
पुत्र हट्टापोटी उद्धव ठाकरे यांनी माती करून घेतली. आदित्य ठाकरेंनी सर्वात आधी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव समोर आणले होते. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबगार व्यक्तीचे नाव त्यांनी समोर करून स्वतः रिमोट कंट्रोल म्हणून वापर करायला हवा होता. शिवसेना वाढली असती आणि ठाकरे नावही आहे तसे राहील असते, असे ते म्हणाले.
तुम्ही निवडून आला की ईव्हीएम चांगले आणि हरला की ईव्हीएमवर आरोप करता. निवडणूक हरल्यामुळे महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री राज्याने पहिल्यांदा पहिला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे मे पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.