Mamta Kulkarni Ameesha Patel Fight: 90 च्या दशकातील बोल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी आता ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्री अचानक गायब झाली. आता जवळपास 23 वर्षांनंतर अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्री महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले आणि काही साधूंच्या विरोधामुळे ममताला या पदावरून हटवण्यात देखील आलं.
बोल्ड फोटोशूट, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध आणि ड्रग्जशी संबंधित वादांसह 90 च्या दशकापासून ममताचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहे. एक काळ असा होता जेव्हा ममता अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासोबत झालेल्या भांडणामुळे चर्चेत आली होती.
हा वाद कार्यक्रमादरम्यान सर्व्ह करण्यात आलेल्या मांसामुळे झाला होता. मुलाखतीत ममताला विचारण्यात आलं की, ‘अमिषा पटेलसोबत भांडण झालं होतं?’ यावर ममता म्हणाली, ‘हो वाद झाले होते… एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी चार ते पास दिवस आम्ही एकाच ठिकाणी होतो. शुटिंगनंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यायची… त्याठिकाणी एक नॉनव्हेज डिश ठेवली होती. डिशवर कोणाचं नाव नव्हतं म्हणून ती नॉनव्हेज डिश मी घेतली…’
‘मी खायला सुरुवात केली. तर ते मांस प्रचंड कडक होतं. मी विचारलं देखील हे काय आहे? हे चावायला एवढं कठीण का आहे… तेव्हा त्यांनी मला सांगितलं, ते हरणाचे मांस आहे. मी तेव्हा भडकली आणि म्हणाली कोणतं मांस आहे, त्याचं लेबल का नाही?’
ममता पुढे म्हणाली, ‘आपण चिकन, मटण किंवा मासे खातो… हरणाचं मांस कोण खातं? याच दरम्यान, अमिषा उपहासाने म्हणाली, ‘हिरोइन्समध्ये खूप राग असतो. छोट्या छोट्या गोष्टींवर त्या तमाशा करतात. मी रागात अमिषाकडे पाहिलं. माझी मॅनेजर अमिषाला म्हणाली, ‘मध्ये बोलणारी तू कोण’?’
मुलाखतीत पुढे ममताला विचारण्यात आलं की, ‘तू रागात अमिषाला, तुझी लायकी काय आहे, माझं मानधन 15 लाख रुपये आणि तुझं 1 लाख रुपये…’ यावर ममता म्हणाली, ‘असं माझी सेक्रटरी म्हणाली होती. खरं सांगू तर कोण कायम बोललं होतं मला आठवत नाही. पण भांडणं झाली होती एवढं नक्की…’ इंडस्ट्रीत सेलिब्रिटींमध्ये कायम असे वाद होत असतात.