महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला होता. मात्र मविआचा दणदणीत पराभव करत महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक निकालही लागले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायरवाड निवडणुकीस उभ्या राहिल्या होत्या, त्या जिंकूनही आल्या. मात्र त्यांच्या विजयानंतर आता त्यांनाच मोठी धमकी मिळाली आहे. ‘ तुमच्या शाळेचे हेडमास्तर आम्हीच आहोत. ईट का जवाब पत्थर से देऊ’ असा दम देत सुलभा आणि गणपत गायकवाड यांना धमकी मिळाली आहे. पराभवानंतर महेश गायकवाड यांनी ही धमकी दिल्याचे समोर आले असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
एका फाईटीत तुला जमिनीत नाय गाडलं तर… महेश गायकवाड यांचं आव्हान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर मविआतर्फे ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र या निवडणुकीत मतदारांनी सुलभा गायकवाड यांना कौल दिल्याने त्यांचा विजय झाला. येथील तिरंगी. अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय झाला. तर महेश गायकवाड हे पराभूत झाले.
मात्र ही हार झाल्यानंतर महेश गायकवाड संतापले असून त्यांनी गायकवाड कुटूंबाला दम देत सूचक इशाराही दिलाय.पराभवानंतर महेश गायकवाड यांनी महायुती आमदार सुलभा गायकवाड आणि त्यांचे पती गणपत गायकवाड यांना “ईट का जवाब पत्थर से देऊ” असा दम भरला. शनिवारी विधानसभा निवडणुकीटचे मिकाल लागले. या निकालानंतर महेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. पराभ झाला तरी कल्याण पूर्वेत आपल्या समर्थकांचे आभार मानताना महेश गायकवाड यांनी मोठ्या लोकसमूहाचे दाखले देत गायकवाड कुटुंबाला खुले आव्हान दिले.
मैदानात माझ्या एवढी लोक जमून दाखवा तेव्हा तुमची खरी जीत झाली असं मानू. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा व घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला करारा जवाब मिळेल, ईट का जवाब पत्थर से मिलेगा. माझी पार्श्वभूमी तुम्ही लोकांना दाखवली आहे, तीच पार्श्वभूमी लक्षात ठेवा. गुंडगिरी करत आमच्या नादी लागू नका, एकालाही सोडणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. बेसावध असताना हत्यार घेऊन माझ्यावरती हल्ला केला. मग आता तुमच्याही हातात हत्यार घ्या, माझ्या हातात (हत्यार) द्या, तुम्ही सांगाल त्या मैदानात येऊ, पाहू कोणामध्ये किती दम आहे असं खुल आव्हान त्यांनी गायकवाड पती-पत्नीला दिलं.
माझा चॅलेंज आहे एका फाईटीत तुला जमिनीत नाय गाढला तर माझं नाव महेश गायकवाड नाही असंही गायकवाड म्हणाले. आम्ही कुठल्याही राजकीय नेत्यांना घेऊन फिरलो नाही, आम्ही आमच्या आईच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी फिरलो. तुमच्या शाळेचे हेडमास्तर आम्हीच आहोत, असंही महेश गायकवाड यांनी सुनावलं .