Published on
:
17 Nov 2024, 7:11 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:11 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ अभिनेत्रीला तेलुगु समुदायावर बोलणे महाग पडले. तिच्याविरोधात तक्रार झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. कस्तूरी शंकरने तमिलनाडूमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात तेलुगु समुदायावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे लोक संतापले. अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर ती गायब होती. पण, आता अखेर अभिनेत्रीला अटक करण्यात आलीय.
कस्तूरी शंकरला तामिलनाडू पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली आहे. अभिनेत्री कस्तूरीला चेन्नई पोलिसांनी साइबराबादमध्ये तेलुगु लोकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली. १४ नोव्हेंबरला मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.
कस्तूरी शंकर साऊथ अभिनेत्री आहे. त्यांनी १९९१ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तमिळ चित्रपट 'आथी भागवन' मधून तिने डेब्यू केला होता. नंतर तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तिने काम केलं. तिने अन्नामैया आणि इंडियन यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटाने तिला ओळख दिली.
का म्हणाली होती कस्तूरी शंकर?
कस्तूरी शंकरने मागील काही दिवसात आयोजित कार्यक्रमात तेलुगु समुदायावर आक्षेपार्ह टीका केली होती. ती म्हणाली होती की, तेलुगु लोक प्राचीन काळात राजांची सेवा करणाऱ्या महिलांचे वंशज आहेत. त्यानंतर तेलुगु समुदायातील लोक संतापले. त्यांनी चेन्नईतील मदुराईमध्ये तिच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलसांनी कारवाई करत नोटिस पाठवली. पण, जेव्हा पोलिस तिच्या घरा पोहोचले, तेव्हा तिचे घर बंद होते आणि तिचा फोनदेखी बंद होता.