दसऱ्याच्या मूहुर्तावर सूरज चव्हाणला अजितदादांकडून गिफ्ट:मोठं घर बांधून देणार, सूरजच्या भविष्याबद्दल रितेश देशमुखसोबत करणार चर्चा

6 days ago 3
दसरा सणाच्या मूहुर्तावर बिग बॉस सीजन 5 चा विजेता ठरलेला सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या पुण्यातील घरी भेट घेतली. यावेळी सूरज आणि अजितदादा यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यासोबतच सूरजचे घर बांधण्याच्या सूचनाही दादांनी केल्या आहेत. त्यामुळे सूरजचे घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. सूरजने भेटीवेळी त्याची बिग बॉसची ट्रॉफीही दादांना दाखवली. यावेळी अजितदादांनी सूरजचे स्वागतही केले. अजितदादांकडून सूरजला घर गिफ्ट सूरजचं घर लहान आहे. त्याला गावात घर बांधून द्या, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकेच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. त्यासोबतच पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडीदादा यांनीही आता सूरजचं पालकत्व स्वीकारलं आहे. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केलं आहे. अजित पवार आणि सूरज चव्हाण यांच्या भेटीचे फोटो... रिलचे पैसे मिळतात का? सूरज चव्हाण आणि अजितदादा यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. यादरम्यान अजितदादांनी सूरजला तू बिग बॉसच्या घरात कसा पोहोचला? यापासूनच ते गाव, बारामती आणि त्याच्या बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासावर अजित पवारांनी सूरजला प्रश्न विचारले. त्यानंतर सूरजने दिलेल्या उत्तरानंतर चांगलाच हशा पिकला. सूरज हा त्याच्या रिलमुळे जास्त फेमस झाला. तसेच, बिग बॉसमध्येही त्याची एन्ट्री ही रिलमुळेच झाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉसमध्ये कसं बोलावलं? तेव्हा सूरजने सांगितलं की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावलं. मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि मी बिग बॉसमध्ये गेलो. त्यानंतर रिलचे पैसे मिळतात का? असे विचारले असता सूरज म्हणाला की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, मात्र आता माझा पिक्चर येतोय. सूरजच्या भविष्याबद्दल रितेश देशमुखसोबत बोलणार - अजितदादा अजित पवार हे म्हणाले की, सूरजच्या भविष्यासाठी मी रितेश देशमुख यांच्यासोबत चर्चा करणार आहे. रितेश देशमुखसोबत सूरजसाठी चर्चा अजित पवार करणार म्हणजेच सूरज भविष्यात अजून मोठ्या चित्रपटात दिसू शकतो. बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजला चित्रपटाची ऑफर आली आहे. त्याने आपल्या चित्रपटाबद्दलची माहिती देखील शेअर केली. बिग बॉस मराठीला रितेश देशमुख हा होस्ट करताना दिसला. बऱ्याचदा रितेश देशमुख हा सूरजचे कौतुक करताना देखील दिसला. आता थेट अजित पवार हेच रितेशला सूरजसाठी बोलणार आहेत. आता सूरज चव्हाण आणि अजित पवार यांच्या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article