दादा भुसे आणि भरतशेठ यांना पालकमंत्रीपद का नाही? एकनाथ शिंदे यांना विचारणार; शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

3 hours ago 3

अखेर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे. काल पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेकांना धक्का बसला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. तर, शिवेंद्रराजे भोसले यांनाही साताऱ्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. एवढंच नव्हे तर भरतशेठ गोगावले आणि दादा भुसे या शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. भरतशेठ गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग केली होती. पण त्यांना या पदापासून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणाही करणार आहेत.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निश्चित त्यांना पालकमंत्रीपद द्यायला हवं होतं. दादा भुसे आणि भरतशेठ हे जुने लोक आहेत. त्यांना पालकमंत्रीपद द्यायला हवं होतं. असं काय झालं की या दोन्ही नेत्यांना पालकमंत्रीपदावरून टाळण्यात आलं, असं मी एकनाथ शिंदे यांना विचारणार आहे. या दोन्ही नेत्यांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करू. भुसे आणि गोगावलेंना पालकमंत्री करावं. आमच्या लोकांच्या विचार करायला हवा होता असं मला वाटतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गडचिरोली हा चॅलेंजिंग विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं पालकमंत्रीपद घेतलं असेल. मी त्याबद्दल बोलणार नाही. पण आमच्या दोन्ही शिलेदारांना पालकमंत्रीपद का मिळालं नाही? असं मात्र विचारणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून पालकमंत्रीपद मिळालं

मला जळगाव जिल्ह्याची पुन्हा धुरा मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात तिसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा मला मान मिळाला आहे. पालकमंत्री मी होईल, किंवा त्यात काय अडचणी आहेत याबाबत मी कधी बोललो नाही. मी सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांवर अवलंबून होतो. त्यांनी विश्वास टाकला आणि पद मिळालं. मी मागची पाच वर्ष पालकमंत्री होतो. आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी समन्वय साधूनच मी काम केलं. त्यामुळे मला पुन्हा पालकमंत्रीपद दिलं असावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

राज्याचे नवे पालकमंत्री…

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे – एकनाथ शिंदे

पुणे – अजित पवार

बीड – अजित पवार

सिंधुदुर्ग- नितेश राणे

अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

वाशिम – हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील

सातारा -शंभुराजे देसाई

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट

जळगाव – गुलाबराव पाटील

यवतमाळ – संजय राठोड

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

अकोला – आकाश फुंडकर

भंडारा – संजय सावकारे

बुलढाणा – मकरंद जाधव

चंद्रपूर – अशोक ऊईके

धाराशीव – प्रताप सरनाईक

धुळे – जयकुमार रावल

गोंदिया – बाबासाहेब पाटील

हिंगोली – नरहरी झिरवळ

लातूर – शिवेंद्रसिंग भोसले

मुंबई शहर – एकनाथ शिंदे

मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

नांदेड – अतुल सावे

नंदुरबार – माणिकराव कोकाटे

नाशिक – गिरीष महाजन

पालघर – गणेश नाईक

परभणी – मेघना बोर्डीकर

रायगड – अदिती तटकरे

सिंधुदुर्ग- नितेश राणे

रत्नागिरी – उदय सामंत

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर

जालना – पंकजा मुंडे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article