दिव्य मराठी अपडेट्स:​​​​​​​​​​​​​​काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; तर तिरुपती लाडू प्रकरणी आज सुनावणी

2 hours ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबई - ​​​​​​​ ​​​​​​​काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देण्याची तयारी उद्धवसेना, शरद पवार गटाने सुरू केली आहे. त्यानुसार इंदापूर (जि. पुणे) येथील भाजपचे नेते हर्ष‌वर्धन पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. ते 6 किंवा 7 ऑक्टोबर रोजी पक्षांतर करतील, असे म्हटले जात आहे.​​​​​​​ तिरुपती लाडू प्रकरण, आज होणार सुनावणी नवी दिल्ली - तिरुपती प्रसादलाडू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी टळली अाहे. आता न्यायालय शुक्रवारी यावर सुनावणी करणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे सुनावणी टाळण्याचा आग्रह केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा तपास न्यायिक निगराणीखाली करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव जाईल 85 हजारांवर, यंदा 20% दरवाढ मुंबई - यावर्षी डिसेंबरपर्यंत देशात सोने 85 हजार रुपयाच्या वर जाऊ शकते. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याची किमत 75,762 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिली. वर्षांच्या शेवटी यात सुमारे 13% उसळी येऊ शकते. 2024 मध्ये सोने आतापर्यंत अाधीच 19.80% महाग झाले आहे. खरंतर, इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सोन्यामध्ये नव्याने वाढ झाली आहे. फिच सोल्युशन्सचे संशोधन युनिट बीएमआय, सिटीग्रुप आणि गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज आहे की, 2024 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 3,000 डॉलरपर्यंत जावू शकते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,659 डॉलर होता. त्यानुसार डिसेंबरपर्यंत त्याची किंमत 13 टक्क्यांनी वाढू शकते. जर हा अंदाज खरा ठरला तर भारतात सोन्याची किंमत 85,600 रुपयांच्या वर जाईल. युद्धाच्या काळात सोन्याची किमत नेहमीच वाढत असते. रशियाने 24 फेब्रुवारी, 2022 रोजी यूक्रेनवर हल्ला केला होता. त्यानंतर 10 मार्चपर्यंत फक्त दोनच आठवड्यातच सोन्याची किमत 4.55% वाढली होती. माजी खासदार ‎इम्तियाज जलील‎ यांच्यावर गुन्हा दाखल‎ जालना - ये औरंगजेब का‎आबाद शहर था और रहेगा, इसे‎हम संभाजीनगर बनने नही देंगे,‎असे प्रक्षोभक भाषण करून‎माजी खासदार इम्तियाज‎जलील यांनी तिरंगा रॅलीमध्ये‎छत्रपती संभाजी महाराज यांची‎बदनामी केली. शिवाय,‎जालना-छत्रपती संभाजीनगर‎महामार्गावरील नामनिर्देषित‎फलकावरील छत्रपती‎संभाजीनगर या नावावर काळे‎फासून विद्रूपीकरण केले आहे.‎या प्रकरणी विशाल जगताप‎यांनी दिलेल्या फिर्यादीवरून‎माजी खासदार इम्तियाज‎जलील व एका अज्ञाताविरुद्ध‎बदनापूर पोलिस ठाण्यात‎गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात‎आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आठवले उद्या बीडला;‎रॅली काढून सत्कार सोहळ्याचे आयोजन‎ बीड - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास‎आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा फेर‎निवड झाल्याबद्दल जिल्हा रिपाइंच्या वतीने उद्या‎शनिवार 5 ऑक्टोबर 2024 रोजी शहरात रॅली‎काढून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले‎असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू‎कागदे यांनी दिली.‎ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11.72 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बोनससाठी 2028.57 कोटी रुपये खर्च केले जातील. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन इत्यादींना बोनस दिला जाईल. तथापि मंत्रिमंडळाने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली. अन्न सुरक्षा आणि कृषी स्वावलंबन साध्य करण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना व कृषोन्नती योजना यांचा एकूण प्रस्तावित खर्च 1,01,321.61 कोटी रुपये आहे. आनंद दिघे मंडळाला रिक्षा चालक-मालकांचा विरोध मुंबई - राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’ला विरोध सुरू झाला आहे. या मंडळाला कामगार नेते शरद राव यांचे नाव देण्याची मागणी होऊ लागली आहे. राज्य सरकारला याबाबत लवकरच पत्र देण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य न केल्या राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी दिवंगत कामगार नेते शरद राव सातत्याने करीत होते. राज्य सरकारने मंडळाची स्थापना करण्यापूर्वी राज्यातील प्रमुख ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांशी चर्चा करायला हवी होती. असा आक्षेप मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शहरे आणि ग्रामीण विभागातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गिरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. कर्नाटक : केकमध्ये आढळले कॅन्सरचे घटक, सरकारकडून अलर्ट बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या तपासणीत केकमध्ये कर्करोग पसरवण्यास जबाबदार असलेले घटक आढळले आहेत. बंगळुरूमधील वेगवेगळ्या बेकरीतून घेतलेल्या केकच्या 12 नमुन्यांमध्ये हानिकारक पदार्थ आढळले. यानंतर राज्य सरकारने लोकांना सतर्क केले आहे. 223 नमुन्यांपैकी 12 मध्ये कृत्रिम रंगांचा वापर धोकादायक असल्याचे आढळले. यापैकी रेड वेल्वेट, ब्लॅक फॉरेस्टसारखे केक याच रंगांद्वारे बनवले जातात. यामध्ये आढळणाऱ्या घटकांमुळे कर्करोग होतो, असे विभागाने म्हटले आहे. तुरुंगात जातीच्या आधारे काम वाटप घटनाबाह्य; सुप्रीम कोर्टाने फटकारले नवी दिल्ली - तुरुंगांतील कैद्यांचा जातीच्या आधारावर भेदभाव तसेच त्यांना जातीच्या आधारावर कामाचे वाटप करण्याला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य म्हटले आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालय म्हणाले की, जेल मॅन्युअलचे असे नियम ज्यात जातीच्या आधारावर विभागणी असेल ते असंवैधानिक आहेत. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला. वरळी अपघातप्रकरणी दोन दिवसांत 700 पानांचे आरोपपत्र दाखल होणार वरळी - वरळी सी फेस परिसरात कावेरी नाखवा अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. वरळी पोलिस याप्रकरणी दोन दिवसांत 700 हून अधिक पानांचे आरोपपत्र सादर करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या हिट अँड रन प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालकाचा पोलिसांनी शोध घेतला असून महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. ‘पुढील वर्षी 9.5% पगारवाढीची अपेक्षा’ नवी दिल्ली - 2025 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.5% वाढ होऊ शकते. जागतिक व्यावसायिक सेवा फर्म एऑन पीएलसीने हा अंदाज व्यक्त केला. उद्योगांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.3% वाढ झाली. पुढील वर्षी अभियांत्रिकी, उत्पादन आणि किरकोळ क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ अपेक्षित आहे. ह्युंदाईचा आयपीओ 14 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली - ह्युंदाईचा आयपीओ 14 ऑक्टोबर रोजी येऊ शकतो. यातून 25 हजार कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. एलआयसीकडे सध्या 21 हजार कोटी रुपये आहेत. शेअर विक्री हा सर्वात मोठा आयपीओ मानला जातो. ह्युंदाईला सेबीकडून 24 सप्टेंबर रोजी मंजुरी मिळाली. मारुती सुझुकी 2003 मध्ये सूचिबद्ध झाली होती. 2 दशकांनंतर ऑटो कंपनी आयपीओ आणत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article