दिव्य मराठी अपडेट्स:जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक; अंतिम निर्णय होण्याची शक्यता

1 day ago 2
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स भोसले बँक घोटाळाप्रकरणी85 कोटींची मालमत्ता जप्त मुंबई - पुणेस्थित शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, हनुमंत संभाजी खेमधारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 85 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. पीएमएलए कायद्यानुसार या सर्वांच्या पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथील स्थावर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. बांदल यांच्या पुण्यातील महंमदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात छापे टाकले होते. मंगलदास बांदल यांच्याकडे पाच आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची चार मनगटी घड्याळेही आढळून आली होती. फडणवीसांच्या ‘व्होट जिहाद’ वक्तव्याची चौकशी मुंबई - ‘व्होट जिहाद’बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी होणार आहे. राज्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले- ‘व्होट जिहाद’ या विधानावर कायदेतज्ज्ञांकडून मत घेतले जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल. याबाबत ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून ‘व्होट जिहाद’बाबत भाषणबाजी होत असली तरी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) मंगळवारपासून कार्यान्वित झाली. आचारसंहिता मंगळवारी सायंकाळपासून लागू झाल्यामुळे अशा विधानांची चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला (राज्य निवडणूक अधिकारी) मंगळवारी सायंकाळपासून मिळाले आहेत. आता ही बाब राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. अशा विधानांची चौकशी करून कारवाई करण्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाला, असा आरोप केला होता. कराडमध्ये शस्त्राचा धाक दाखवून हवालाची पाच कोटींची रक्कम लुटली सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडजवळच्या मलकापूर हद्दीत शस्त्राच्या धाकाने कारमधील 5 कोटींची रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ही रक्कम व्यापाऱ्याची असून ती मुंबईहून दक्षिण भारतात हवालामार्फत नेली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 21 दिवसांत दूर करा पेन्शनची तक्रार- केंद्र नवी दिल्ली - पेन्शनधारकांच्या तक्रारी 21 दिवसांत निकाली काढा, असे केंद्राने सर्व विभागांना सांगितले आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानुसार, ‘हे कार्यालयाशी संबंधित नाही’ असे म्हणत कोणतेही प्रकरण बंद करता येणार नाही. ज्या प्रकरणांत अधिक वेळ लागतो त्याबाबत पोर्टलवर अंतरिम उत्तर देता येऊ शकेल. व्हीआयपींची सुरक्षा एनएसजीऐवजी एसआरपीएफकडे नवी दिल्ली - दहशतवादविरोधी कमांडो दल एनएसजीला व्हीआयपी सुरक्षेतून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एनएसजी सुरक्षा प्राप्त 9 ‘अत्यंत जोखमे’च्या अति महत्त्वाच्या दिग्गजांची (व्हीआयपी) सुरक्षा आता सीआरपीएफचे जवान करतील. गृह मंत्रालयाने यासाठी विशेष प्रशिक्षित जवानांची नवी बटालियन सीआरपीएफच्या व्हीआयपी सेलसोबत जोडण्यास मंजुरी दिली. नवी बटालियन काही महिन्यांपूर्वी संसदेच्या सुरक्षेत होती. संसदेत गतवर्षी सुरक्षेत चूक झाल्यानंतर संसदेची सुरक्षा सीआरपीएफकडून काढून घेत सीआयएसएफकडे सोपवली होती. सूत्रांनुसार, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, माजी सीएम व बसप अध्यक्षा मायावती, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, छत्तीसगडचे माजी सीएम रमण सिंह, गुलाम नबी आझाद, फारूक अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडूंना एनएसजी सुरक्षा मिळाली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article