दुर्गसावंगीत जावयाची सासुरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या:उसने पैसे न दिल्याचे कारण, पत्नीसह, सासू, सासऱ्यावर बासंबा पोलिसांत गुन्हा दाखल

2 hours ago 1
हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथे सासऱ्याला दिलेले उसने पैसे परत मिळत नसल्याने जावयाने सासुरवाडीत येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी ता. 24पत्नी, सासू, सासऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गसावंगी येथील उल्हास चव्हाण यांची मुलगी बाली यांचा विवाह वाशीम जिल्हयातील धुमका येथील संजय माणिक राठोड (35) यांच्यासोबत झाला होता. विवाहा नंतर काही दिवसांनी उल्हास याने त्याचे जावई संजय राठोड यांच्याकडून काही पैसे हात उसने घेतले होते. मात्र काही दिवसांतच पैसे परत करतो असे सांगूनही त्यांनी वेळेवर पैसे परत केले नाही. त्यामुळे संजय यांनी त्यांच्याकडे हात उसने दिलेले पैसे देण्याची वारंवार मागणी केली. मात्र त्यांनी टाळाटाळ सुरु केली होती. तसेच पैसे मागणाऱ्या जावयास मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. दरम्यान, सजंय राठोड हे पैसे घेण्यासाठी दुर्गसावंगी येथे आले असतांना त्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे त्यांनी ता. 23 नोव्हेंबर रोजी सासुरवाडी दुर्गसावंगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत संजय यांचे भाऊ पंजाब राठोड यांनी रविवारी ता. 24 बासंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी उल्हास रेवा चव्हाण, प्रेमसिंग उल्हास चव्हाण, जिजाबाई उल्हास चव्हाण, बाली संजय राठोड यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आडे, उपनिरीक्षक किसन आडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार खंडेराव नरोटे पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article