​​​​​​​देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री?:बरीच चर्चा अन् मोठ्या वाटाघाटीनंतर दिल्लीश्वरांनी नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती

2 hours ago 1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राजकारभार पाहतील. दुसरीकडे, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. पण तत्पूर्वी, बरीच चर्चा व वाटाघाटी केल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला असला तरी त्याच्या छोट्या भावांनी म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तावाटपाच्या चर्चेत चांगलाच जोर लावल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. महायुतीने ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली. त्यामुळे शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाईल असा दावा केला जात होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती आहे. काही वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पण त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार? उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने पहाटेच्या वेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ते औटघटकेचे सरकार ठरले होते. त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे 10 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेचे 6 व अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. मुख्यमंत्री कोण होणार? याचा फैसला दिल्लीत होणार असला तरी मंत्रीपदासाठी चांगलीच स्पर्धा वाढली आहे. एकट्या विदर्भातून तब्बल 24 आमदार मंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. भाजपकडून सर्वाधिक 18, शिवसेनेतून दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघांकडून दावेदारी केली जात आहे. यापैकी किती जणांना संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 137 वर पोहोचले आहे. त्या तुलनेत शिवसेनेला 57 व राष्ट्रवादीच्या अजित पवार गाटला 41 जागा मिळाल्या आहेत. हे ही वाचा... अजित पवारांचे CM पदाचे स्वप्न पूर्ण होणार?:भाजप राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता; मुख्यमंत्रीपदासाठी 3 फॉर्म्युल्यांवर गंभीर चर्चा मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. पण निकालाला 3 दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात यश आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. या प्रकरणी 3 फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. त्यात फडणवीस यांना तूर्त थांबण्याचे निर्देश दिले जातील. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article