देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील माझे स्थान ओळखावे:शरद पवारांचा पलटवार; राष्ट्रपती राजवटीसाठी पत्राच्या आरोपाने राजकारण तापले

6 days ago 3
शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रामुळे 2019 मध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी पलटवार केला आहे. तेव्हा राज्यात मी सत्तेत नव्हतो, माझ्याकडे काही संस्थेचे सदस्यत्व देखील नव्हते. तरी देखील मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली, याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे. त्यांनी राज्यातील राजकारणातील माझे स्थान काय आहे? हे ओळखावे असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मागील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्र असल्याचा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी हा पलटवार केला आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा फेटाळून लावला असल्याचे आता बोलले जात आहे. शरद पवार यांनी चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून हा पलटवार केला आहे. नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 2019 मध्ये​​​​​​ राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचे होते. हे पत्रच माझ्या कार्यालयात टाईप करण्यात आले होते. त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी शरद पवार यांनी काही बदलही सुचवले होते. त्यामुळे शरद पवार म्हणत असतील तर राष्ट्रपती राजवट लागू होणार, हा त्या योजनेचाच एक भाग होता. त्या पत्रामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. संजय राऊत यांचाही पलटवार देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 25 वर्षे शिवसेनेबरोबर युती असताना देखील त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. या प्रक्रियेमध्ये मी होतो. त्यामुळे मला सर्व माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितले जात होते. मात्र जे ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असा आमचे म्हणणे होते. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या गोंधळलेले व्यक्तिमत्व आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा आता शिपाई झाला आहे. त्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाचे अध:पतन केले आहे. अडीच वर्षे तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केले, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article