दोन आंदोलनांनी शहर दणाणले‎:जिल्ह्यातील 2697 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार‎

3 hours ago 2
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६९७ प्रशिक्षणार्थी विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. मात्र महायुती सरकारने अद्यापही हा कार्यकाळ वाढवण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यावर त्याच आस्थापनेत कायम करावे, अशी प्रशिक्षणार्थींची मागणी आहे. गुरुवारी या युवकांनी "मायबाप सरकार करु नका आम्हाला पुन्हा बेरोजगार' असे बॅनर हातात घेत युवा प्रशिक्षणार्थींनी शहरातून मूकमोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मूकमोर्चा स्वराज भवनातून निघाला होता. यावेळी आम्हाला सहा महिन्याचा कार्यकाल संपल्यावर त्याच आस्थापनेत कायम करावे, कार्यकाळ वाढवून देण्यात यावा, विद्या वेतनात वाढ करावी, शासकीय विभागाच्या परीक्षाभर्तीमध्ये प्रशिक्षणार्थी यांच्याकरता १० टक्के आरक्षण द्यावे, असे फलक हातात घेऊन मागण्या करण्यात आल्या. प्रतिनिधी | अकोला अमृतसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून तपास करून चौकशी करावी व आरोपीला हे कृत्य करावयास लावणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घ्यावा. आरोपी आणि मास्टरमाइंड यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ शिक्षा करावी, या मागणी करिता वंचित बहुजन आघाडीने हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वंचितने आक्रमक भूमिका घेत अशा घटना खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी दिला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वंचितचे राज्य महासचिव राजेंद्र पातोडे, श्रीकांत घोगरे आम्रपाली खंडारे, शोभा शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते होते. राष्ट्रपतींना पाठवले निवेदन पुतळा विटंबना घटनेचा तीव्र निषेध वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी केला. अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिले. रोजगार कायमस्वरुपी हवा युवा प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ संपल्यानंतर यापुढे आम्ही करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाल्याचे युवकांचे म्हणणे आहे. परिणामी पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ युवकांवर ओढवणार आहे. कायमस्वरुपी रोजगार मिळावा, आम्हाला कार्यकाळ व विद्यावेतनेही वाढवून देण्यात यावे, असेही युवा कार्य प्रशिक्षणार्थींची म्हणणे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article