मृत्यूच्या घटनेवर दोन संत म्हणवल्या जाणाऱ्यांच वक्तव्य सध्या महाराष्ट्रासह देशातही वादात आहे. प्रयागराजमध्ये चेंदराचेंगरी होऊन मेलेल्या मोक्ष मिळाला असं म्हणणाऱ्या बागेश्वर बाबा विरोधात संताप व्यक्त होतोय.
सध्या महाराष्ट्र आणि देशात दोन शास्त्रींची विधाने वादात आहेत. निर्घृण हत्येनंतर ही माऱ्येकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं म्हणणारे नामदेव शास्त्री सानप आणि दुसरे म्हणजे किड्यामुंग्यांप्रमाणे प्रयागराजमध्ये मेलेल्या माणसांना मोक्ष मिळाल्याचं म्हणणारा बागेश्वर बाबा उर्फ धिरेन्द्र शास्त्री. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या राजकारणावरून वारकरी संप्रदायालाही त्रास झाला असं म्हणणाऱ्या नामदेव शास्त्री विरोधात शरद पवार गटाच्या वारकरी आघाडीने काही प्रश्न उपस्थित केलेत. वारकरी संप्रदाय आरोपींची पाठराखण कधीपासून करायला लागला याच उत्तर त्यांनी नामदेव शास्त्री यांच्याकडून मागितलंय. तर तिकडे प्रयागराजमध्ये बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनीही संताप व्यक्त केलाय. महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीत ३० लोक मेले याचा दावा सरकार करतेय. मात्र अनेक लोक आपले नातेवाईक परतले नसल्याचं म्हणत तक्रारी करताहेत. यावर आमची टीम जेव्हा दवाखान्यात पोहोचली तेव्हा त्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 05, 2025 09:31 AM