धनंजय मुंडेंकडून कौटुंबिक अत्याचार; करुणा,मुलीला 2 लाख द्या- कोर्ट:मुंडे म्हणतात पत्नी नाही, पण प्रतिज्ञापत्रात उल्लेख

2 hours ago 2
खंडणीखोर वाल्मीक कराडची पाठराखण, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण, पीक विमा घोटाळा, कृषी साहित्य खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपामुळे वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातही अडचणीत आले आहेत. त्यांच्या विभक्त पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्या याचिकेवर वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यात करुणा मुंडे - शर्मा यांनी धनंजय यांच्यावर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप कोर्टाने अंशत: मान्य केला. तसेच उदरनिर्वाहासाठी करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये पोटगी द्यावी, मुलगी शिवालीला तिच्या लग्नापर्यंत दरमहा ७५ हजार रुपये द्यावेत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) ए.बी.जाधव यांनी दिला. दरम्यान, या आदेशाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. मला १५ लाख रुपये पोटगी हवी आहे. माझ्या घराचा हप्ता १ लाख ७० हजार रुपये आहे. मेंटेनन्स दरमहा ३० हजार रुपये आहे. बेरोजगार मुलगा घरात आहे, अशा परिस्थितीत २ लाखात काय होणार, असा प्रश्नही करुणा यांनी केला. पोटगी नव्हे मेंटेनन्स; हिंसाचार नाहीच : मुंडेंचे वकील धनंजय मुंडेंचे वकील अॅड. शार्दूल सिंग : ही पोटगी नाही तर मेंटेनन्स आहे. जो विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणांत दिला जातो. धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबत लिव्ह इनचा स्वीकार केलेला आहे. करुणा यांनी ५ ते २५ लाख मेंटेनन्सची मागणी केली होती. सध्या खर्चाला पैसे नाहीत असे त्यांचे म्हणणे होते, म्हणून न्यायालयाने ही रक्कम देण्याचे अंतरिम आदेश दिले. मात्र कोर्टाच्या आदेशात कुठेही करुणा यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला असे म्हटलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कलेक्टर केबिनमध्ये वाल्मीक कराडने मारले धनंजय यांनी कौटुंबिक हिंसाचार केला. माझ्या बहिणीवरही शारीरिक अत्याचार केले. वाल्मीक कराडने कलेक्टर केबिनमध्ये मला मारले. नको तिथे हात लावला. वडील आईशी कठोर, आमच्याशी चांगले वडील आईशी कठोर पण आमच्याशी मात्र चांगले आहेत. आईच आमचा छळ करते, अशी पोस्ट मुलाने केली. त्याच्यावर दबाव असल्याचे करुणा यांनी सांगितले. करुणा यांना दरमहा १.२५ लाख, शिवालीला ७५ हजार करुणा यांची याचिका : धनंजयशी ९ जानेवारी १९९८ रोजी आंतरजातीय प्रेमविवाह झाला. आधी इंदूरमध्ये राहायचो, नंतर मुंबईत आलो. एक मुलगा व एक मुलगी आहे. २०१८ पर्यंत वैवाहिक जीवन सुरळीत होते, पण त्यानंतर अचानक धनंजय यांच्या वागणुकीत बदल झाला. नंतर धनंजय यांनी राजश्रीसोबत दुसरे लग्न केले. कुटुंबीयांच्या दबावाखाली ते करावे लागले. मात्र मला नेहमीच पहिल्या पत्नीचा दर्जा देतील असे आश्वासन धनंजय यांनी दिले. त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून मी दुसऱ्या लग्नाची तक्रार केली नव्हती. पण नंतर धनंजय यांच्याकडून माझ्यावर घरगुती हिंसाचार करण्यात आले. धनंजय मुंडेंचा युक्तिवाद करुणा यांच्याशी माझे घरगुती नातेसंबध नसल्याने ती घरगुती हिंसाचार कायद्यानुसार पीडित व्यक्ती ठरत नाही. त्यामुळे त्यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण २९ एप्रिल २०१४ रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला. धनंजय मुंडे यांनी २०१७ मध्ये ‘वसीयतनामा’ तयार केला आहे. त्यात करुणा मुंडे पहिली पत्नी आणि राजश्री दुसरी पत्नी असल्याचे मान्य केले आहे. तसेच परळी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा यांची मुले त्यांच्यावर अवलंबून असल्याचा उल्लेख केला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंशी विवाह केल्याचे मान्य केले आहे. हा विवाह कायदेशीर आहे की नाही हे दोन्ही पक्षांनी सादर केलेल्या पुराव्यावरून ठरवले जाईल. मात्र कागदपत्रांवरून असे दिसून येते की धनंजय यांनी करुणा यांना पत्नी आणि मुले असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या घरगुती नातेसंबंध दिसून येत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. करुणा यांनी याचिकेत आरोप केला की, धनंजय मुंडे हे वैवाहिक दर्जाला नाकारत आहेत. मूळ गावी परळी येथे जाण्यासही त्यांनी मनाई केली. तरीही मी तिथे गेले असता कारवर दगडफेक झाली, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. मात्र धनंजय यांच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. या वेळी करुणा मुंडे यांनी छायाचित्रे कोर्टासमोर सादर केली. धनंजय मुंंडे यांच्या वतीने अॅड शार्दूल सिंग यांनी तर करुणा मुंडे यांच्या वतीने अॅड. गणेश कोल्हे यांनी युक्तिवाद केला. धनंजय यांनी करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये आणि मुलगी शिवालीसाठी दरमहा ७५ हजार दरमहा खर्च द्यावा. ही रक्कम अर्जाच्या दाखल दिनांकापासून देय राहील. हा अंतिम निकाल नाही. तो येईपर्यंत धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंवर यापुढे घरगुती हिंसाचार करू नये. पोटगीच्या खटल्याचा खर्च २५ हजार रुपये करुणा यांना द्यावा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article