मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना, एका महिन्यांत 5 लाख लाभार्थी कमी झाले आहेत. वय, वाहन आणि उत्पन्न या निकषांमुळे काही महिला अपात्र ठरल्या आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तथापि, योजना बंद होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन 7 महिने उलटून गेले असून आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र त्याची धास्ती अनेक महिलांच्या मानत असून अवघ्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 5 लाखांनी घट झाली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता महायुतीच्या एक नेत्याने यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झाली शिवसेना शिंदे गटाचे नेत, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं. या योजनेत काही नियम आहेत. ज्यांच वय 65 पेक्षा जास्त असेल, ती चालणार नाही , किंवा ज्यांच्याकडे चारचाकी असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. तसेच अनायवधानाने किंवा नजरचुकीने अशा महिला या योजनेत आल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. जाणीवपूर्वी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही. ती आहे तशीच चालू राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
तसेच चारचाकीचा निकष, अडीच लाख इन्कम दाखवून कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याही महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतात, हे सर्व निकष आहेत. या सगळ्या नियमांत न बसल्यामुळे काही महिला कमी झाल्या असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाहीत, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी अपडेट होत आहे.