लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहनं आहेत की नाही? याची तपासणी सुरू झाली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेत. बघा स्पेशल रिपोर्ट
लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी लाडक्या बहिणी पात्र आहेत की नाही याची चौकशी सरकारने सुरू केली. पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाड्या आहेत, अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून दूर केले जात आहे. माहितीनुसार पुण्यात आतापर्यंत 75 हजार अर्ज नियमबाह्य निघाले आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी चांगलाच निशाणा साधलाय. सत्तेत येण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक कोटी लाडक्या बहिणींची कुठलीही चौकशी किंवा चाचपणी न करता पैसे जाहीर केले आणि मतं घेतले. आता पैसे बंद करणार असल्याचे म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला. एक महिन्याचं सोडा इलेक्शन बघून दोन-तीन महिन्याचे एकाच वेळी पैसे सरकारने दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव करतायत. त्याच्यावरून जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणींच्या मताचा वापर केला असे म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला. तर विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सत्ताधारी मंत्र्यांनी योजना बंद होणार नसल्याचा विश्वास महिलांना दिला. लाडक्या बहिणी फसवणूक कशी आहे? आपण जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी चालू राहणार आहे आणि 2100 रुपये सुद्धा देणार आहोत आम्ही त्याला. लाडक्या बहिणींना फसवणार नाही आम्ही आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले तर कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही. कोणी खोडा घालायला आला कोण तर त्याला जोडा दाखवा, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
Published on: Feb 07, 2025 12:04 PM