हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक दिवस आणि तिथीचं महत्त्व आहे. ग्रहमंडळात प्रत्येक क्षणाला काही ना काही घडामोडी घडत असतात. सूर्य देव हे ग्रहमंडळाचे राजे आहेत. त्यांच्यातील नेतृत्व क्षमता आपल्यात यावी यासाठी त्यांची पूजा केली जाते. सूर्य देवांचा गोचर कालावधी हा एका महिन्यांचा असतो. सूर्याच्या गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. सूर्यदेव 12 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली लाब मिळतो. या दिवशी गंगासहीत पवित्र नदीत स्नान आणि ध्यान करण्याची प्रथा आहे. अनेकांना हे शक्य होत नाही. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यातच गंगाजल मिश्रित करून त्या स्नानाची अनुभूती घेतली जाते. संक्रातीला सूर्याला अर्घ्य आणि त्याची पूजा केली जाते. हिंदू धर्मानुसार सूर्याला कुंभ संक्रांतीला अर्घ्य दिल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच सूर्यकडून चांगल्या आरोग्याचं वरदान मिळतं. या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना काही मंत्रांचा जप केल्याने इच्छित फळ मिळतं.
कुंभ संक्रांती कधी आहे?
या वर्षी कुंभ संक्रांती 12 फेब्रुवारीला आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. हिंदू पंचांगानुसार, 12 फेब्रुवारीला रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत जातील. उदय तिथीनुसार कुंभ संक्राती ही 13 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. कुंभ संक्रांतीला पुण्य काळ दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी संपेल. या दिवशी महापुण्य काळाची सुरुवात संध्याकाळी 4 वाजून 19 मिनिटांपासून होईल. तर महापुम्याकाळ संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी संपेल. यावेळेस कुंभ संक्रांतीचा पुण्यकाळ हा 5 ताप 34 मिनिटांचा आहे. तर महापुण्यकाळ हा 2 तास 51 मिनिटांचा आहे.
कसं द्याल अर्घ्य
सकाळी लवकर उठून स्नानविधी पूर्ण करून घ्या. त्यानंतर कुलदेवतेचा नामस्मरण करा. एका तांब्याच्या कळशात पाणी घ्या आणि दोन्ही हातात कळश घेऊन डोक्यापासून उंच असा पकडा. सूर्याला अर्घ्य देताना हलकी पाण्याची धार सोडत त्या पडण्याऱ्या पाण्यातून सूर्याकडे पाहा. त्यामुळे सूर्य किरणांची सकारात्मक अनुभूती मिळेल. यावेळी काही मंत्रांचा जप करा.
सूर्याला अर्घ्य देताना या मंत्रांचा जप करा
- ॐ सूर्याय नमः
- ॐ घृणि सूर्याय नमः
- ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
- ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
- ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
- ॐ आदित्याय नमः
- ॐ भास्कराय नमः
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)