कॅनडा’ ऐवजी अमेरिकेत, आता पोहोचला नागपुरात
नागपूर(Nagpur) :- कॅनडामध्ये जाण्यासाठी निघालेल्या नागपुरातील एका युवकाचे मॅक्सिकोतून (Maxico) माफियांनी अपहरण केले. माफियांनी त्या युवकाचा पैशांसाठी अतोनात छळ केला. त्याच्याकडून ५० लाख रुपये घेतले. सलग तीन दिवस पायी चालविल्यानंतर अमेरिकेच्या सिमेपार सोडून दिले. अमेरिकेत बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारागृहात(prison) डांबण्यात आले. शेवटी अमेरिकेने त्या युवकाला भारतात सोडले. तो युवक गुरुवारी सकाळी नागपुरात पोहचला. नागपुरात पोहचताच पाचपावली पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याने अंगावर काटा उभा राहणारी आपबिती सांगितली. हरप्रीत सिंग लालिया (३३), रा. बाबा बुद्धाजीनगर, पाचपावली असे त्या युवकाचे नाव आहे.
देशात ट्रॅव्हर्ल्स एजंटच्या नावाखाली रॅकेट सक्रिय
दलालाने पैसे घेऊन त्याला अन्य दलालाच्या माध्यमातून कायरो इजिप्तला (Egypt) पाठवले. तेथे अन्य १५० जण दलालासोबत होते. त्यांनाही कॅनडाला जायचे होते. तेथे चार दिवस थांबविण्याल्यानंतर मॉटेरियाड येथे नेण्यात आले. तेथून लगेच स्पेनमध्ये नेण्यात आले. चार दिवस पुन्हा थांबल्यानंतर ग्वॉटेमॉला देशात नेले. तेथून निकारागुवा आणि हॉडरस या देशातून मॅक्सिकोमध्ये नेण्यात आले. मॅक्सिकोजवळील टेकॉयटन सीमेवर थांबविण्यात आले. तेथे पोलिसांनी त्यांना पकडले आणि माफियाच्या ताब्यात दिले. त्या माफियांनी अपहरण करुन एका जंगलात नेले. तेथे सर्वांना खंडणी म्हणून लाखोंची मागणी करण्यात आल्याची माहितीहरणीतने प्रसारमाध्यमांना दिली. यावरून केंद्र सरकारला भारतातील ट्रॅव्हर्ल्स एजंटच्या अवैध धंद्याची साखळी तोडणे आवश्यक झाल्याचे समोर आले.
अमेरिकेतून लष्करी विमानाने आले १०४ जण
अमेरिकेतून १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात आणणारे लष्करी विमानसी-१७ ग्लोबमास्टर बुधवारी दुपारी एक वाजता पंजाबमधील अमृतसरमधील (Amritsar) गुरुरविदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तरले. ४५ अमेरिकन पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवकांचा समावेश होता. हरप्रीतसिंग लालिया (३३), रा. नागपूर, मुंबई येथील गुरविंदर सिंग (४४) आणि नाशिक-आडगाव येथील प्रशांत अनिल जहागीरदार (३२) या तिघांचा समावेश होता. मुंबईतून हरप्रीतसिंग याला गुरुवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. नागपुरात पाचपावली पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाबुराव राऊत यांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. त्या युवकाने आपल्यासोबत घडलेल्या आतापर्यंतची सर्व आपबिती पोलिसांना सांगितली.
आधी सौदी अरब, नंतर केला कॅनडाचा ‘प्लॅन’
कॅनडा देशात वाहन चालकाला चार लाख रुपये वेतन दिल्या जात असल्यामुळे हरप्रीतसिंगला तेथे नोकरी करायची होती. त्यामुळे त्याने एक ट्रक विकला आणि आलेल्या पैशातून कॅनडाला जाण्याची तयारी केली. व्हिज्ञा आणि पासपोर्ट काढले. ५ डिसेंबर २०२४ ला दिल्लीवरून तो सौदी अरबला पोहोचला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला नोकरीसाठी परवानगी नसल्याचे सांगून दिल्लीला परत पाठवले. हिरमोड झाल्यानंतर पंजाबमधील गुरुदासपूर येथे नातेवाईकाच्या माध्यमातून तो एका एजंट व्या जाळ्यात अडकला. त्याने १८ लाख रुपये दिल्यास थेट कॅनडात नेण्याची हमी दिली. त्यामुळे हरप्रीतने त्याला १८ लाख रुपये दिले आणि तो फसत गेला.