Uday Kotak and Family bought Entire Building: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रियल ईस्टेटमधील सर्वात मोठा सौदा झाला आहे. हा सौदा बॉलीवूड सेलिब्रिटीकडून नाही तर उद्योग विश्वातून झाला आहे. देशातील सर्वात श्रीमंत बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी रियल ईस्टेटमधील देशातील सर्वात महाग सौदा केला आहे. त्यांनी मुंबईत फ्लॅट नव्हे तर संपूर्ण बिल्डींगच खरेदी केली आहे. या बिल्डींगची किंमत 400 कोटी रुपये आहे. त्यांनी खरेदी केलेली ही रहिवाशी इमारत आहे.
कोणत्या भागात घेतली बिल्डींग
महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी मुंबईतील वरळी भागात पूर्ण बिल्डींग घेतली आहे. ही रहिवाशी इमारत त्यांनी 400 कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. या खरेदीनंतर देशात रियल इस्टेटमध्ये नवीन विक्रम निर्माण झाला आहे. उदय कोटक यांनी या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांकडून त्यांची घरे विकत घेतली आहे.
कोटक परिवारने जी बिल्डींग घेतली ती दोन मजली आहे. त्यात एकूण 24 फ्लॅट आहेत. उदय कोटक यांनी 30 जानेवारी रोजी 24 फ्लॅट पैकी 12 फ्लॅटची खरेदी उपनिबंधक कार्यालयात केली. तसेच या बिल्डींगमधील एक सौदा डिसेंबर महिन्यात झाला होता. इतर सौदेही लवकर होण्याची अपेक्षा आहे. ज्या लोकांचे सौदे राहिले आहे, त्यांना टोकन दिले गेले आहे.
हे सुद्धा वाचा
असा दिला गेला दर
वरळीमधील या इमारतीतील सर्वात मोठा फ्लॅट 1,396 स्क्वेअर फूटचा आहे. त्याची किंमत 38.24 कोटी रुपये आहे. 173 स्क्वेअर फुटांच्या सर्वात लहान घराची किंमत 4.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कोटक कुटुंबियांनी या इमारतीतील घरे सुमारे 2.72 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केली आहे. कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारासाठी देशात दिलेली ही सर्वाधिक किंमत आहे. दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोड येथे देशात प्रति चौरस फूट सर्वाधिक किंमत 2.25 लाख रुपये दर आहे. तसेच भुलाभाई देसाई रोड येथे 2.09 लाख रुपयांचा दर प्रति चौरस फूटावर आहे.
मुंबईत असे झाले व्यवहार
- अक्षय कुमार यांची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी वरळीतील एक आलिशान अपार्टमेंट 80 कोटी रुपयांना विकले.
- प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक आणि त्यांची पत्नी अंजू मलिक यांनी मुंबईतील सांताक्रूझ वेस्ट येथे दोन अपार्टमेंट विकले आहेत. हा सौदा फेब्रुवारीमध्ये 14.49 कोटी रुपयांना झाला होता.
- सनी लिओनी हिने मुंबईत 8 कोटी रुपयांना ऑफिसची जागाही विकत घेतली आहे.
- सोनाक्षी सिन्हा हिने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका गृहनिर्माण संकुलातील आपला अपार्टमेंटही विकला आहे. हा व्यवहार 22.50 कोटींमध्ये झाला.
- चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनीही काही दिवसांपूर्वी पत्नीसह मुंबईत 24 कोटी रुपयांच्या फ्लॅटची खरेदी केली होती.
- अमिताभ बच्चन यांनी त्यांचे ओशिवरा येथील डुप्लेक्स अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले होते. तो 31 कोटी रुपयांना विकत घेतला.