धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक आर्थिक घोटाळ्याची माहिती आहे. वेळ आली तर मी सगळी माहिती बाहेर काढेन, असा इशाराही करूणा शर्मांनी दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे अनेक लोकं आहेत, असं म्हणत कलेक्टर कॅबिनमध्ये धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडकडून मला मारहाण झाली, असा मोठा दावा करूणा शर्मा यांनी केला. इतकंच नाहीतर पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत, माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत. शिवाय धनंजय मुंडे यांची राजकीय शक्तीचा वापर करून आका जमिनी, संपत्ती बळकवतात, असं म्हणत करूणा शर्मा यांनी वाल्मिक कराडचं नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे. लवकरच आकाची नावं सांगणार असं म्हणत करूणा शर्मांनी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, करूणा शर्मा यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करूणा शर्मा यांचं समर्थन केलंय. ‘करूणा शर्मा यांनी केलेल्या अनेक दाव्यानंतर आता त्यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही पाहिजे. त्यांना मारून टाकलं जाईल, त्या सगळं बाहेर काढणार असं म्हणत असतील तर त्यांना नक्कीच सुरक्षा दिली पाहिजे’, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
Published on: Feb 07, 2025 05:06 PM