UPSC Topper Ansar Shaikh: संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा देशातील नाही तर जगातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यामध्ये लाखो उमेदवारांपैकी शेकडो उमेदवारांना यश मिळते. काही उमेदवार अनेक वेळा परीक्षा दिल्यावरही त्यांना यश मिळत नाही. परंतु 21 वर्षीय अन्सार शेख हे यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. देशात सर्वात कमी वयाचे आयएएस अधिकारी बनवण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात राहणारे ऑटोरिक्षा चालक युनूस शेख अहमद यांचा मुलगा असलेले अन्सार देशातील सर्वात कमी वयाचे आयएएस अधिकारी आहे. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले. यूपीएससी परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण करून ते देशातील सर्वात तरुण आयएएस बनले होते. त्यांना ऑल इंडिया रँक 361 मिळवली.
अन्सार अतिसामान्य परिवारातून
अन्सार हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले. परंतु प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट केले. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक दिवस पुरेल एवढा पैसा मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबाने कठोर परिश्रम केले आहेत. ज्या कुटुंबात शिक्षणाला कधीच प्राधान्य दिले जात नव्हते, अशा कुटुंबातून ते आले. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या वडिलांना आपल्या कुटुंबासाठी कष्ट करताना आणि आईला शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पाहिले होते.
हे सुद्धा वाचा
शाळेतच हुशार विद्यार्थी
अन्सार नेहमीच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. ज्ञान मिळवण्यासाठी आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्याच्या लहानपणापासूनच कठोर अभ्यास केला. एक वेळ अशी आली की अन्सारच्या वडिलांना त्याचे नाव शाळेतून काढून टाकायचे होते. परंतु त्या अन्सार यांनीच देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी होण्याचा विक्रम केला. अन्सार यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांनी पदवीमध्ये ७३ टक्के गुण मिळवले. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली.