प्रत्येक जण सकाळी उठल्यावर सकारात्मक उर्जेसह दिवसाची सुरुवात करण्याचा प्रयत्नात असतो. दिवस कसा चांगला जाईल यासाठी प्रयत्नशील असतो. पण अनेकदा सकारात्मक विचार करून दिवस वाईट जातो. त्यामुळे दिवसाच्या शेवटी मन अस्वस्थ होतं. वास्तुशास्त्रात याबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे. सकाळी उठल्यावर काही गोष्टी जाणीवपूर्वक बघणं टाळाव्यात असं सांगितलं गेलं आहे. नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो असं सांगितलं गेलं आहे. तसेच तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो असं वास्तुशास्त्र सांगतं. चला जाणून घेऊयात सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहीजेत त्या..
उष्टी भांडी : सकाळी उठल्यावर उष्टी भांडी पाहू नयेत. असं पाहिल्यास घरात गरीबी येते किंवा खाण्यापिण्याची भ्रांत होते असं मानलं जातं.त्यामुळे रात्रीच उष्टी भांडी धुवून ठेवा. कारण सकाळी उठल्यावर अशा भांड्यांचं दर्शन घडणार नाही.
बंद पडलेलं घड्याळ : सकाळी उठल्यावर प्रत्येक जण आधी घड्याळ पाहतो. वास्तुशास्त्रानुसार, बंद घड्याळ नकारात्मक ऊर्जा पसरवते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद घड्याळ्याचं दर्शन न झालेलंच बरं… जर असं झालंच तर कामाच अडचणी येतात. त्यामुळे घरात बंद घड्याळ ठेवूच नये.
स्वत:ची किंवा इतरांची सावली : सकाळी उठल्यावर आपली किंवा इतरांची सावली पाहू नये. वास्तुशास्त्रानुसार, असं पाहिल्यास पूर्ण दिवस खराब जातो. तसेच डोक्यात चित्रविचित्र विचार येतात. त्याचा कामावर नकारात्मक परिणाम होतो.
आरसा : सकाळी उठल्यावर आपला चेहरा आहे तसा आरशात पाहू नये. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या स्वताचा चेहरा आरशात पाहण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्रानुसार हे शुभ नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे सर्वात आधी देवाचं नाव घ्या आणि मग इतर कामं करा.
झाडू आणि कचऱ्याचा डबा : सकाळी उठल्या उठल्या झाडू किंवा कचऱ्यांचा डबा पाहू नये. यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच आपल्या कामात अडचणी येतात.
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आपल्या दोन्ही हाताच्या तळहाताकडे पाहावं. त्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥ हा मंत्र म्हणावा आणि दोन्ही हात चोळून डोळ्यांना लावून तोंडावरून फिरवा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)