यंदाचं 2025 वर्ष हे सामान्य लोकांसाठी अत्यंत लकी ठरताना दिसत आहे. या आठवड्यातच आम नागरिकांना दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत. एक म्हणजे बजेटमध्ये आयकरात मोठी सवलत मिळाली आहे. म्हणजे 12 लाखाची वार्षिक कमाई टॅक्स फ्रि करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सामान्य माणूस खूश असतानाच दुसरी आनंदाची बातमी येऊन धडकली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याज दरात कपात करून कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.50 टक्क्याने कमी होऊन 6.25 टक्क्यावर आला आहे.
रेपो रेट कमी झाल्याने त्याचा फायदा घराचा हप्ता भरणाऱ्यांना जसा होणार आहे. तसाच कारचं कर्ज फेडणाऱ्यांनाही होणार आहे. ज्या लोकांनी कार लोन घेतलं आहे. त्याच्या व्याज दरात कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी झाला आहे. पण कार लोन ईएमआयमध्ये किती फरक पडणार आहे? किती फायदा होणार आहे? किती हप्ता कमी जाणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आम्ही तुम्हाला तेच आकडेवारीनुसार दाखवणार आहोत.
कार लोनवरील ईएमआय किती कमी होणार याची माहिती काढण्यासाठी आम्ही एसबीआयच्या कार लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर केला आहे. या लोनची 3 अमाऊंट 10 लाख, 12 लाख आणि 15 लाखाचं कर्ज घेणाऱ्यांना किती फायदा होणार आहे? त्यांचा हप्ता किती कमी होणार आहे याची माहिती देणार आहोत. सध्याच्या काळात एसबीआयचा कार लोनच्या व्याज दर 10.15 टक्के आहे. तो आता 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 9.90 टक्के होणार आहे. आता याचं प्रत्येक रकमेनुसार गणित समजून घेऊया.
10 लाखाच्या कार लोनवर किती फायदा?
जर तुम्ही 10 लाखाचं कार लोन घेतलं असेल तर सध्याच्या काळात 7 वर्षाच्या कार लोनवर 10.15 टक्के व्याज पडतं असं समजू. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता 16,679 रुपए होईल. आता व्याज दरात 25 बेसिस पॉइंटची कपात झाली आहे. म्हणजे आता व्याजाचा दर 10.15 ऐवजी 9.90 टक्के होणार आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता आता 16,550 रुपए होणार आहे. याचा अर्थ कार लोनवर तुमचे प्रत्येक महिन्याला 129 रुपये वाचणार आहेत.
12 लाखाच्या कार लोनवरचा लाभ किती?
आता तुमचं कार लोन 12 लाख आहे. आणि ते 7 वर्षासाठी असून सध्या व्याजाचा दर 10.15 टक्के आहे, असं समजलं तर तुमचा कारचा हप्ता 20,015 रुपए होईल. पण आता 25 बेसिस प्वाइंटच्या कपातीनंतर एसबीआयचा व्याज दर 9.90 टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा कार लोनचा हप्ता 19,859 रुपए होईल. म्हणजे तब्बल 156 रुपयांची बचत होणार आहे.
15 लाखावर हप्ता किती कमी होणार?
जर तुमच्या कारचं कर्ज 15 लाख असेल. कर्ज फेडण्याचा कालावधी 7 वर्ष असेल आणि सध्याचं व्याज 10.15 टक्के पकडलं तर तुमचा हप्ता 25,018 रुपए होईल. आता आरबीआयच्या घोषणनेनुसार 25 बेसिस प्वाइंटची कपात झाली आहे. म्हणजे हा व्याजदर थेट 9.90 टक्के झाला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता आता 24,824 रुपये होणार आहे. याचा अर्थ तुमचे महिन्याला तब्बल 194 रुपये वाचणार आहेत.