लातूर (Latur) :- पोलीस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी लातूरच्या पोलीस मुख्यालयात त्यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले.
7 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री.शहाजी उमाप हे वार्षिक निरीक्षण व तपासणी पुढील 4 दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी पोलीस मुख्यालयात (Police Headquarters) पोलीस समारंभ कवायतचे त्यांनी निरीक्षण केले.
वार्षिक तपासणीसाठी चार दिवसांचा दौरा
परेडचे संचालन पोलीस अधीक्षक, श्री सोमय मुंडे, सेकंड इन-कमांड श्री. बि. चंद्रकांत रेड्डी, आयपीएस परिविक्षाधीन अधिकारी श्री. सागर खर्डे यांनी यांनी केले. पोलीस परेड नंतर लातूर पोलीस दलाकडून मॉब डिसपर्सल, किट परेड, लाठी ड्रिल, स्कॉड ड्रिल, वाद्य पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमलदार तसेच सेवानिवृत्त पोलीस (Retired Police)अधिकारी/अमलदार यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर स्नेहसंमेलनामध्ये पोलीस उप महानिरीक्षक, श्री शहाजी उमाप यांनी पोलीस अधिकारी अमलदारांच्या अडचणी जाणून घेतल्या व तात्काळ उपायोजना करण्यात आदेश दिले.
65 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना साभार परत
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित लातूर जिल्ह्यामधील विविध गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्याच्या कार्यक्रम पोलीस उप-महानिरीक्षक, श्री शहाजी उमाप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने, मोटार सायकल, चारचाकी वाहन तसेच मोबाईल असे एकूण 80 गुन्ह्यातील जवळपास 65 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना साभार परत देण्यात आला. यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपींकडून मुद्देमाल मिळवून आम्हाला परत केला. याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.