लातूर (Latur) :- महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे दुसरे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन (Statewide Biennial Convention) लातूर येथे उद्या रविवारी (दि.९) सकाळी १० वाजता होणार आहे. पाच नंबर चौकातील राहीचंद्र मंगल कार्यालयात या अधिवेशनाचे उद्घाटन सेवानिवृत्त आयएएस अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी ते ‘संविधान अंमलबजावणीतील अडथळे व उपाय’, या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन सेवानिवृत्त आयएएस अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते होणार
अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते श्यामदादा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, अभिनेता किरण माने, संघटनेचे सल्लागार अरुण भालेराव व अशोक सोनवणे उपस्थित राहून वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात कार्यकर्त्यांचे मनोगत होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ बोढारे राहणार असून यात संघटनेचे सर्व केंद्रीय तसेच झोन विद्युत केंद्र शाखांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने सरचिटणीस जालिंदर पांढरे व सर्व सहकाऱ्यांनी तसेच अधिवेशन संयोजन समितीने केले आहे.