Maha Shivratri 2025 Lucky Zodiac: वैदिक ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून यंदाच्या वर्षाची महाशिवरात्री काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीपासून चांगले दिवस सुरू होतील. नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसून येईल. सनातन धर्मात महाशिवरात्रीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा सण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो.
या दिवशी भगवान शिवाचा विवाह माता पार्वतीशी झाला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी महाशिवरात्री बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. असं देखील म्हटलं जातं, की महाशिवरात्री ही शंकराची पूजा करण्यासाठी सर्वात मोठी रात्र आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीनुसार शंकराची पूजा करतात. ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञांच्या मते, यंदाची महाशिवरात्र खूप खास आहे. या दिवशी श्रवण नक्षत्र आणि परीघ योग यांचा अप्रतिम संयोग होईल. याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होणार आहे.
महाशिवरात्री तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊया महाशिवरात्रीपासून कोणत्या 3 राशींना चांगले दिवस येतील…
मेष राशी : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची महाशिवरात्री मेष राशीच्या व्यक्तींसाठी खास असणार आहे. यादिवसापासून मेष राशीच्या लोकांचे उत्तम दिवस सुरु होतील. शिवाय, शंकराच्या कृपेने काही शुभवार्ता मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. याशिवाय वैवाहिक जीवनात आनंद राहील. नोकरदारांना पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. मानसिक त्रासातून आराम मिळेल.
मिथुन राशी : महाशिवरात्री मिथुन राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित कामात विशेष लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या रणनीतींसाठी तुम्ही चर्चेत असाल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्यांचा देखील फायदा होईल. पैशाशी संबंधित कोणतीही मोठी योजना साकार होईल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह राशी: महाशिवरात्रीपासून सिंह राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या राशीच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी चांगली भेट किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते.