अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांना रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांनी नगर रस्ता, खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, येरवड्यातील गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जावे. खराडी बाह्यवळण मार्ग, मुंढवा चौक, मगरपट्टा, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक, मार्केट यार्डमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने येणार्या अवजड वाहनांनी हडपसर, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. हडपसरकडून मंतरवाडी, सासवड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.
बंदी घातलेले मार्ग
नगर रस्ता - विमाननगर चौक ते दत्त मंदिर चौक, शास्त्रीनगर चौकातून कल्याणीनगरकडे जाण्यास मनाई, येरवड्यातील पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाण्यास बंदी, वडगाव शेरीतून कल्याणीनगर भागातील बिशप शाळेकडे जाण्यास मनाई, पेट्रोल साठा चौकातून लोहगाव विमानतळ रस्त्याकडे जाण्यास बंदी,