मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून जरांगेनी मंत्री धनंजय मुंडे यांवर आरोप केले. बीड जिल्ह्यात मुंडे सांघटित गुन्हेगारी घडवत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी जरांगेनी केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून जरांगेनी मंत्री धनंजय मुंडे यांवर पहिल्यांदाच ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘३०२ लावायला पाहिजे तोच सांघटित गुन्हेगारी घडवून आणतोय. मालक कोण आहे? तोच त्याच्या सोबत फिरतोय. माझ्याकडेपण त्यालाच घेऊन आला होता. त्याच्यासोबत दुसरे कसं काय नव्हते कोणी? जर त्याच्या तो जवळचा नाही. तर तो प्रत्येक जागेवर कसा काय आहे? अंतरवाली सुद्धा होता. त्यांनीच ओळख करून दिली होती.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडे सांघटित गुन्हेगारी घडवून आणत आहेत असा आरोप जरांगेनी केला. यानंतर वादाला वाद नको म्हणून शांत बसलोय असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. मीडिया मध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काही अवघड नाही पाच वर्ष राज्य विरोधी पक्षनेते राहिलेलो आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये अति संवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसलोय. पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचं? असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
पण खंडणी आणि खून करायला धनंजय मुंडे यांनीच माणसं पाठवली असा आरोप करून जरांगेनी खळबळ उडवली आहे. तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दबाव आणून तपासावर परिणाम झाल्यास सरकार जबाबदार असे म्हटले. तर आव्हाड आणि बीडमधला खरा आका धनंजय मुंडेच असल्याची टिका केली. दरम्यान, इकडे नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं नारायणगडाच्या महंतांनी म्हटले आहे.
Published on: Feb 05, 2025 09:52 AM