धुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून गुरूवारी (दि.६) जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शासनाने त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाचे साहेबराव देसाई, विनोद जगताप, निंबा मराठे, संदीप पाटोळे, भैय्या शिंदे, किशोर वाघ, दीपक रौंदळ, वीरेंद्र मोरे, नितीन पाटील, विक्रम काळे, मनोज ढवळे, मनोहर जाधव, वामन मोहिते, भानुदास चौधरी, भूषण बागुल, कैलास वाघारे, सचिन मराठे, उल्हास पाटील, प्रफुल माने, केतन भामरे, रमेश जीवरक, महेश गायकवाड, हेमंत भडक, अतुल साळुंखे आदी सहभागी झाले होते. यावेळी राहुल सोलापूरकर यांचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून व त्यांच्या प्रतिमेचे दहन करून घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले.