नगर क्लब मैदानावर दिवस-रात्र रंगणार फुटबॉल सामन्यांचा थरार:नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन

2 hours ago 1
फुटबॉल खेळाला चालना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने शहरातील नगर क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन ललिता प्रकाश फिरोदिया यांच्या हस्ते झाले. दिवस-रात्र रंगणाऱ्या लीग कम नॉक आऊट फुटबॉल सामन्यांच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे. नमोह फुटबॉलच्या नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघमालक दर्शन भंडारी (जीसी फायटर्स), सागर कायगावकर (एसजीके गोल्ड स्टार), जोएब खान (गुलमोहर चॅलेंजर्स), अभिनंदन भन्साळी (अवित्री वेलोसिटी किंग्स), प्रणिल मुनोत (कॉन्प्लेक्स सुपर हीरो), चेतन गांधी (गांधी वॉरीअर्स), ऋतविक वाबळे (आरडीएक्स ज्युनियर), आशिष तोट्टू (एक्सलन्स अचिव्हर्स) आदींसह खेळाडू उपस्थित होते. नमिता फिरोदिया म्हणाल्या की, मुला-मुलींनी मैदानी खेळाची आवड जोपासण्याची गरज आहे. लहान मुलांमधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू घडवण्यासाठी शहरात नमोह फुटबॉल क्लब कार्यरत आहे. विविध प्रशिक्षण शिबिर व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंचा चालना देण्याचे कार्य सुरू आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू पुढे येत असून, त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ दिले जात असल्याची माहिती फिरोदिया यांनी यावेळी दिली. याप्रसंगी संघाचे प्रशिक्षक ऋषी पाटोळे, मयूर टेमक, प्रसाद पाटोळे, प्रणय रागिनवार, सिध्दार्थ चौहान, सौरभ चौहान, रोहन कुकरेजा, अक्षय बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ वांद्रे व ऋतिक चौहान परिश्रम घेत आहे. आठ संघांमध्ये होणार स्पर्धा नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने १५ वर्षांखालील शहरातील १०० उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धेसाठी निवडण्यात आले. आठ संघमालकांनी या खेळाडूंची आपल्या संघात निवड केली. या आठ संघात ही स्पर्धा सुरु असून, दिवस-रात्रच्या सत्रात फ्लड लाईटमध्ये फुटबॉल सामन्यांचे रंगतदार सामने होत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रारंभी खेळाडूंनी मैदानातून उत्कृष्ट संचलन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article