नवरात्रात चालणारा गरबा हिंदूंना लागलेला कलंक:संभाजी भिडे यांचे सांगलीत वादग्रस्त वक्तव्य

2 hours ago 2
सार्वजनिकरीत्या गणपती उत्सव आणि नवरात्रोत्सव हे ‘ईव्हेंट’ पध्दतीने साजरे केले जातात. त्यामुळे हिंदु समाज षंड बनला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी शनिवारी दुर्गा दौडीच्या समारोप कार्यक्रमात बोलताना केले. जगातील सर्व धर्माचा बाप व्हायचा मार्ग हिंदु समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. पण गणपती उत्सवाचा आणि त्यात सहभागी होणाऱ्या तरुणांचा मार्ग धर्माला अत्यंत घातक आहे. नवरात्रच्या काळात चालणारा गरबा तर हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे. हे सगळे करमणुकीच्या नावाखाली पोलिसांच्या सहकाऱ्याने सुरू आहे. त्यामुळे हिंदु धर्मातील सनातनी वृत्ती नाश पावत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मिळालेले पंतप्रधान यांनी हिंदु-मुस्लिम भाई भाई असे म्हणत त्यांच्या गळ्यात गळे घातले. हे आपले दुर्दैव होते. हिंदुंचे जातीय राजकारण व सत्ताकारण आणि अर्थकारण हे शुद्र पध्दतीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ४० वर्षे जे राजकारण केले गेले, ते थुंकण्याच्या लायकीचे होते, असेही भिडे म्हणाले. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भिडे हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांच्याविरोधात अनेक महिला संघटनांनी आंदोलने देखील केली. मात्र, तरीही भिडे पुन्हा पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article