नागणसूरच्या पुण्यस्मरणोत्सवात लाखभर भाविकांनी घेतला पुरणपोळीचा प्रसाद:श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वरांच्या 92 वे पुण्यस्मरण, 33 जोडप्यांचा विवाह‎

1 day ago 1
नागणसूर येथील श्री जगदुरु बसवलिगेश्वर यांच्या तुप्पीन मठात श्री जगद्गुरु बसवलिगेश्वर पुण्यस्मरणोत्सवानिमि त्त मंगळवारी झालेल्या सोहळ्यात दिवसभरात एक लाखांहून अधिक भाविकांनी पुरणपोळीचा प्रसाद घेतला. या प्रसादासाठी दहा क्विंटल तूपाचा वापर करण्यात आला. या सोहळ्यात १५ हजार पेक्षा जास्त सुवासिनीचा ओटी भरण्यात आली. तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यात ३३ जोडप्यांचे विवाह झाला, तर ७००० जंगम गणांचे पूजन धार्मिक पद्धतीने करण्यात आले. मंगळवारी सकाळी ५ वाजता महा रुद्राभिषेक , ध्वजारोहण, सकाळी १० वाजता धर्मसभा, नागणसूरचा नंदादीप श्री जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्कार वितरण सोहळा झाला. आंतरराष्ट्रीय योग आश्रम ऋषिकेश हिमालय आणि अमेरिकेचे श्री स्वामी रितावान भारती यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.यावेळी मुगळखोड जिडगा मठाचे मुरुगराजेंद्र स्वामीजी, गुरुपादलिंग महास्वामीजी मत्याना बबलाद,यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील प्रमुख विविध क्षेत्रातील मान्यवर, महास्वामीजी उपस्थित होते. एक लाखभर पेक्षा जास्त भाविकांना मोफत ने -आण करण्यासाठी ३५० ते ४०० वाहनांच्या माध्यमातून मोफत सेवा बजावण्यात आली. सकाळी सहा ते रात्री Share with facebook आठ वाजेपर्यंत भाविकांची मोफत ने आण सुरु होती. ४५० पेक्षा जास्त चालक प्रत्येकी एकाने पाच सहा वेळा मोफत ने आण केल्याचे जीप चालक मालक संघटनेचे शिवलिंग हंद्राळमठ यांनी सांगितले. Share with facebook महास्वामीच्या उपस्थितीत मंगलारती अमेरिकेतील रितवान भारती आदीसह विविध महास्वामींच्या उपस्थितीत मंगलआरती करण्यात आली. षटस्थळ ध्वजारोहण झाल्यावर धर्मसभा पार पडली.सोमवारी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या साधकांच्या सत्कार झाला. तसेच सुप्रसिद्ध गायक बसवराज नरेंद्र, रमेश कुरुबगट्टी, प्रसिद्ध गायक रेवणसिद्ध फुलारी आणि मरियप्पा भजंत्री यांचा गान रसमंजरी गाण्याचा कार्यक्रम झाला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. सोहळा अनुपम झाल्याचे श्री अभिनव महास्वामी यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article