नागपुरात एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली फाशी:सेवानिवृत्त शिक्षकाने पत्नी, 2 मुलांसह उचलले टोकाचे पाऊल, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

1 hour ago 1
नागपुरात एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्याच्या उपराजधानीत एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृ्त्तानुसार, नागपूरच्या नरखेड येथील मोवाड परिसरात विजय पचौरी हे सेवानिवृत्त कुटुंब सहकुटुंब राहत होते. पचोरी यांनी आपली पत्नी व 2 मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुधवारी सकाळी उजेडात आली. या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह ताब्यात घेतलेत. या प्रकरणी विजय पचोरी यांच्या शेजाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article