हरियाणात भाजपला मिळालेल्या यशानंतर नुकतेच पीएम मोदी यांनी नायब सिंह सैनी यांचे अभिनंदन केले.(Image source- PM Modi X account)
Published on
:
12 Oct 2024, 7:18 am
Updated on
:
12 Oct 2024, 7:18 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते नायब सिंह सैनी १७ ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे.
पंचकुला येथील परेड मैदानावर सकाळी १० वाजता भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होईल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.