नाशिक पश्चिममध्ये होणार फेरमतमोजणी:EC चा निर्णय, ठाकरे गटाच्या उमेदवाराने केली होती मागणी; छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये होणार?

1 hour ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण आता अनेक मतदारसंघात ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवाराच्या मागणीनुसार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 5 टक्के मतदान केंद्रांवरील मतदानाची फेरमतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांच्याशी सामना झाला होता. त्यात सीमा हिरे यांचा विजय झाला होता. सीमा हिरे यांना 1 लाख 41 हाजर 725 मते पडली होती, तर बडगुजर यांना 73 हजार 651 मते मिळाली होती. या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली होती. या पराभवानंतर सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक निकालावर हरकत नोंदवत फेर मतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार नाशिकचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एका पत्राद्वारे सुधाकर बडगुजर यांना प्रतियुनिट 40 हजार शुल्क व 18 टक्के जीएसटी भरण्याची सूचना केली आहे. हे शुल्क भरल्यानंतर नाशिक पश्चिम मतदारसंघातील 5 टक्के मतदान केंद्रांवरील मतदानाची फेरमतमोजणी केली जाणार आहे. औरंगाबाद पश्चिम व मध्य मतदारसंघातही फेरतमोजणीचे संकेत दुसरीकडे, ठाकरे गटाच्या औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे व औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या दोन्ही उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी आवश्यक असणारे शुल्क भरण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत यासंबंधीचे निर्देश दिल्याचे शिंदे व थोरात यांनी सांगितले. परळीतील 150 मतदान केंद्रावर बोगस मतदान दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील 140 ते 150 मतदान केंद्रांवर मृत मतदारांचे मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमु्ख यांनी केला आहे. याविषयी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. या प्रत्राला निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे देशमुख यांनी सांगितले आहे. पण त्यावरही लवकरच एखादा निर्णय होण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article