नाशिकमध्ये दुसऱ्यादिवशी मोठा राडा:भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, अंबड पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी

2 hours ago 1
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. मतदारांना स्लीप वाटण्यावरून झालेल्या वादातून ही हाणामारी झाली. या हाणामारीत एका कार्यकर्ता जखमी झाला. घडलेल्या प्रकारानंतर नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला परत जाण्यास सांगितले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सावता नगर परिसरात ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते मतदारांना स्लीपचे वाटप करत होते. या दरम्यान भाजप कार्यकर्ते तेथे आले आणि ठाकरे गटासोबत त्यांचा वाद झाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की, भांडण होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठले. भाजपचे कार्यकर्ते देखील पोलिस ठाण्यासमोर गेले. पोलिस ठाण्याबाहेर मोठा फौजफाटा भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबड पोलिस ठाण्यासमोर एकत्र आल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी इतर पोलिस ठाण्याचे अधिकारीही अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. पोलिसांनी त्यांना परतण्याचे आवाहन केल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते परत गेले. नाशकात कालही झाला होता राडा दरम्यान, नाशिकमध्ये कालही दोन पक्षांमध्ये राडा झाला होता. भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला होता. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे या सभा रद्द करून पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. हे ही वाचा... नाशकात भाजप-शरद पवार गटात जोरदार राडा:वाहने फोडली, सुप्रिया सुळेंनी सभा रद्द करून गाठले पोलिस आयुक्तालय विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच नाशकात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असून वाहने फोडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलिस आयुक्तालय गाठले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article