फिरण्याची आवड आहे? मग ‘या’ शहरात गेला नसेल तर काय फायदा?; पृथ्वीवरचा जणू…

2 hours ago 1

भारत हा जसा विविधतेने नटलेला देश आहे, तसाच तो निसर्ग सौंदर्याने भरलेलाही देश आहे. परदेशातील पर्यटनस्थळां इतकीच अप्रतिम पर्यटन स्थळं भारतात आहेत. भारतात निसर्ग असा ओसंडून वाहतो. त्यामुळेच देशातील अनेक भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. काही राज्यांची अर्थव्यवस्था तर या पर्यटनावरच अवलंबून आहे. भारतातील काही स्थळांना तर पृथ्वीवरील स्वर्गही म्हटलं जातं. इतकी अनोखी आणि अप्रतिम अशी ही पर्यटनस्थळं आहेत.

नॉर्थ ईस्टमधील राज्य तर नैसर्गिक सौंदर्याचा खजिनाच आहे. मेघालय सुद्धा हे त्यापैकीच एक राज्य. मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये तर निसर्गाची उधळणच झालेली पाहायला मिळते. शिलाँगच्या निसर्ग सौंदर्याने देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही आकर्षित होतात. झरने, धबधबे आणि मोकळी मैदाने हे या राज्याचं मुख्य वैशिष्ट्ये आहे. शिलाँगमध्ये तर मोठ्या प्रमाणावर झरे आहेत. दऱ्या आहेत. याशिवाय मेघालयाचं युनिक कल्चर आणि खानापाण्याची पद्धत या सर्व गोष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. तुम्हाला शिलाँगला फिरायला जायचं असेल तर काही ठिकाणी नक्कीच भेट द्या. अशा काही स्थळांचीच ही माहिती.

एलिफंट फॉल्स

राजधानीपासून 12 किलोमीटरवर एलिफंट फॉल्स आहे. मॉडर्न जीवनापासून दूर आनंदी क्षण घालवण्यासाठी तुम्ही इथे जरुर जाऊ शकता. हा धबधबा तीन स्टेप वा टियरमध्ये दिसतो. प्रत्येक टियरमधून पाहिल्यास त्याचं सौंदर्य खुलून उठतं. पहिल्या टियरपर्यंत सहज चालत जाता येतं. दुसऱ्या टियरला पोहोचण्यासाठी हायकिंग करावं लागतं. तिसऱ्या टियरला जाणं कठिण आहे. हे एक साहसी काम आहे. या ठिकाणी एक नैसर्गिक पूल आहे. या ठिकाणी बोटिंग केली जाऊ शकते. फोटोग्राफी, साहस, कल्चरल कपडे आणि हायकिंग या गोष्टी सुखावह ठरतात.

डॉन बॉस्को म्यूझियम

हा सात मजली अत्यंत सुंदर म्यूझियम आहे. या ठिकाणी अख्ख्या नॉर्थ ईस्टच्या संस्कृतीची माहिती अत्यंत प्रभावीपणे मिळते. इथलं कल्चर, ट्रॅडिशन, लाइफस्टाइल आणि इतिहासही पाहायला मिळतो. त्यामुळेच या म्युझियमला आशियातील सर्वात मोठा कल्चरल म्युझियम म्हटलं जातं.

पोलीस बाजार

हे शिलाँगचं मुख्य मार्केट आहे. शिलाँगला येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या ठिकाणी टुरिस्ट मनसोक्त शॉपिंग करू शकतात. शिलाँगचं कल्चर, खानपान, हँडिक्राफ्ट, ज्वेलरी आदी यूनिक गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोलीस बाजारात जायलाच हवं.

शिलाँग पीक

हा शिलाँगचा सर्वात उंच पीक आहे. एअर फोर्स बेसवर स्थित आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ओळखपत्राची आवश्यकता असते. या ठिकाणाहून संपूर्ण शहराची पॅनोरमिक व्ह्यू पाहता येतो. या ठिकाणाला पर्यटक आवर्जुन भेट देतात.

लेडी हैदरी पार्क

शहराच्या मध्यवर्ती भागात हा पार्क आहे. शांतपणे काही क्षण घालवायचे असतील तर या ठिकाणी नक्की जा. फुलांची चादर तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेलच पण एक छोटसं प्राणी संग्रहालयही पाहायला मिळेल. लहान मुलांसाठी हे खास डेस्टिनेशन आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article