पुण्यात 8 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क:खडकवासलात 68 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

2 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता कर्तव्यावर असलेल्या एकूण ८ हजार २७२ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा केंद्रावर १४ नोव्हेंबर अखेर टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जिल्ह्यात नमुना १२ भरुन दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाकरीता १४ नोव्हेंबर अखेर सुमारे १६ हजार मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत, त्यापैकी जुन्नर विधानसभा मतदारसंघात-१३२, आंबेगाव-१४१, खेड-आळंदी-२३१, शिरूर-४००, दौंड-१ हजार २५१, इंदापूर-६०३, बारामती-५२१, पुरंदर-३२०, भोर-७०७, मावळ-३५०, चिंचवड- १ हजार ७२, पिंपरी-४७७, भोसरी-८२, वडगाव शेरी-३४७, शिवाजीनगर-३८२, कोथरूड-१८७, खडकवासला-६५१, पर्वती-१२७, हडपसर विधानसभा मतदारसंघात २९१ असे एकूण ८ हजार २७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार टपाली मतदान जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान नोंदिवण्याकरीता सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. टपाली मतदान प्रक्रिया १९ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासलात 68 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघांतर्गत 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण 70 मतदारांनी फॉर्म क्रमांक 12 डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 68 मतदारांनी गृह मतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृहमतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू न शकणाऱ्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 5 हजार 849 असून 55 दृष्टिहीन मतदार आहेत. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठ्या (स्लिप) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारसंघात 960 दिव्यांग मतदार असून, त्यातल्या 16 दिव्यांग मतदारांना घरी जाऊन मतदान घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली, अशी माहिती दिव्यांग कक्षाचे समन्वयक विनोद हाके यांनी सांगितली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article