नियमित योग केल्याने कामात सकारात्मकता:आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे स्वेरीत योग दिन साजरा
3 hours ago
1
‘नियमित योग केल्याने आपले मन प्रसन्न राहते. हाती घेतलेल्या कार्यात सकारात्मकता निर्माण होते, उत्साह वाढतो व आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ होते.’ असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी यांनी केले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दि.२१ तारखेला सामुहिक ‘योग दिन’ साजरा करण्याचे घोषित केले होते. तेंव्हापासून प्रत्येक महिन्याच्या दि. २१ तारखेला न चुकता स्वेरीत ‘योग दिन’ घेतला जातो. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर २०२४ हा स्वेरीमध्ये ‘पाचवा योग दिन’ साजरा करण्यात आला. या उपक्रमाला प्रथम वर्ष अभियांत्रिकी व वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. डॉ.एन.पी. कुलकर्णी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रार्थनेने सुरवात करून साध्वी तत्वमयी यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांच्याकडून पुढे तासभर विविध प्राणायम करवून घेतले. सूर्यनमस्कार सह विविध आसने, भस्रीका प्राणायम तसेच श्वास, फुफुस्से, शरीराच्या विविध अवयवांच्या हालचालीसाठी योगाचे विविध प्रकार करून घेतले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)