नियोजनाअभावी समदं ओके म्हणणाऱ्या पाटलांचा पराभव:शेकापने सांगोल्याचा गड केला पुन्हा काबिज

2 hours ago 1
विठ्ठल देशपांडे | सांगोला निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख विजय झाले. जातीचे कार्ड व ५५ वर्षांच्या नियोजनबद्ध कामाची पोचपावती म्हणावी लागेल. आमदार शहाजी पाटील यांना अतिआत्मविश्वास नडला. प्रचार आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अभाव, यामुळे पराभव पत्करावा लागला. शेतकरी कामगार पक्षाची ५५ वर्षे तालुक्यात एक हाती सत्ता होती. हा पक्ष वाड्या-वस्त्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत सांगोल्यात आलेले डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी २५,००० मतांनी विजय मिळवला. वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याबरोबरच मत विभाजनाचा फायदा त्यांना झाला. नियोजनबद्ध प्रचार, त्याचप्रमाणे जातीचे कार्ड त्यांना या वेळी उपयोगी पडले. आजी-माजी आमदार निवडणुकीत उभारल्याने मतविभाजनाचा फायदा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार धैर्यशील मोहिते यांची साथ लाभल्याने ते सहज विजयी झाले. त्याचाच त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. आमदार शहाजी पाटील यांच्याकडे गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला पक्षवाढीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही. नियोजनात मोठा अभाव त्यांच्या सहकाऱ्यांबाबत मतदारांमध्ये द्वेष भावना होती. परंतु महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा हेतू मतदारांचा अजूनही होता. पण त्याचे त्यांना फायदा करून घेता आला नाही. निवडणुकीत कोणतेही नियोजन नव्हते. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र मोठ्या फरकाने पराभव झाला. शेकापने गत पंचवार्षिकला गमावलेला गड पुन्हा काबिज केला. विद्यमान आमदार असतानाही शहाजी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. कोट्यवधीचंी कामे केली, पण अपयश आले शहाजी पाटील यांनी हजारो कोटी रुपयांची कामे तालुक्यात केली. विविध योजनांच्या माध्यमातून पाणी आणले. तालुक्यात केलेल्या कामांचा पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांच्या मित्रांना कोणताही फायदा झाल्या नसल्याची ही चर्चा आहे. त्याचाही फटका शहाजी पाटील यांना बसला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article