नेते, अधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यात 11 वर्षांत 26 कोटींच्या 4466 भेटवस्तू:सर्वाधिक 984 गिफ्ट मिळाल्या पंतप्रधान मोदींंना

1 hour ago 1
कोणत्याही देशाचे नेतेमंडळी, मंत्री किंवा प्रशासकीय अधिकारी दुसऱ्या देशात गेले की तेथे त्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. नियमाप्रमाणे ५००० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू “तोशाखाना’ येथे जमा कराव्या लागतात. त्यामुळे गेल्या ११ वर्षांत भारतीय नेते, मंत्री अधिकाऱ्यांना किती किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या, हे दिव्य मराठीने शोधले. तेव्हा जुलै २०१३ पासून विविध दौऱ्यांत २६.३८ कोटी किमतीच्या ४४६६ वस्तू भेट म्हणून मिळाल्या. सर्वाधिक वस्तू पंतप्रधान मोदींना मिळाल्या असल्या तरी आजवरील सर्वात महागड्या गिफ्टच्या मानकरी तत्कालीन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आहेत. त्यांना ६.७० कोटींचे हिऱ्यांचे दागिने मिळाले आहेत. “दिव्य मराठी’ने माहिती अधिकारातून २०१३ पासून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती मागवली. भेटवस्तूंचे परिसंचलन विदेशी अभिदाय (दान किंवा भेटवस्तूची स्वीकृती किंवा प्रतिधारण) कायदा २०१२ अंतर्गत केले जाते. देशात परतल्याच्या ३० दिवसांत भेटवस्तू संबंधित मंत्रालय किंवा खात्याच्या सचिवाकडे सुपूर्द करणेे बंधनकारक आहे. ५००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वस्तू संबंधितांना परत केल्या जातात. यावरील रकमेच्या वस्तू संग्रहालये, ग्रंथालये किंवा कार्यालयात ठेवतात. जुलै २०१३ पासून त्याची महिनावार नोंद ठेवली जाते. तत्कालीन परराष्ट्र व्यवहारमंत्री स्वराज यांना सर्वात महाग ६.७० कोटींचे गिफ्ट आजवरील सर्वाधिक महागडे ६.७० कोटींचे सिल्व्हर डायमंड एमरेल्ड ज्वेलरी सेटचे गिफ्ट दिवंगत सुषमा स्वराज यांना मालदीवच्या दौऱ्यात मिळाले. १ कोटीच्या वर िगफ्ट मिळालेल्यांमध्ये एक परराष्ट्र सचिव-४ कोटी, प्रत्येकी १ उपसचिव आणि सहायक सचिव- १.२५ कोटी तर परराष्ट्रच्याच ६ जणांना १ कोटीचे गिफ्ट मिळाले. राजकारण्यांमध्ये निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, राजनाथ सिंह, एम.जे. अकबर, पीयूष गोयल आणि मीनाक्षी लेखी यांना सर्वाधिक भेटवस्तू मिळाल्या. २०१८मध्ये २८ अधिकाऱ्यांना मिळाले प्रत्येकी १ लाख ७५ हजार रुपयांचे घड्याळ राजकारण्यांना ६५% गिफ्ट ११ वर्षांत २६.३८ कोटी रुपयांच्या ४४६६ भेटवस्तू मिळाल्या. यात पंतप्रधान आणि मंत्र्यांना मिळून २९१७ (६५%) वस्तू आहेत. उर्वरितमध्ये दौऱ्यात सोबत जाणाऱ्या प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश अाहे. सोनिया गांधी यांनाही संसद सदस्य म्हणून २४ गिफ्ट मिळाले. १०० रुपये ते कोटीपर्यंत भेटवस्तू साडी, शॉल, बेडशीट, टी-सेट, केटली, फ्रेम, बांगड्या, नेकलेस, मेकअप किट, पेन, पुस्तके, पेंटिंग, टाय, घड्याळ, सोन्याचे नाणे, गणपतीची मूर्ती, परफ्युम आदी गिफ्ट देण्याची पद्धत आहे. एकूण ४४६६ पैकी सर्वाधिक ३३७५ भेटवस्तू रु.१००-रु.१ लाख, १ लाख-१ काेटीच्या १५९ तर १ कोटीहून अधिक महागाच्या १० वस्तू आहेत. मोमंेटो, शील्ड यासारख्या ६७३ भेटींना बाजारमूल्य नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article