463 बचत गटाच्या माध्यमातून आता महिला होताहेत स्वावलंबी:शिवन्याच्या नारीशक्ती महिला प्रभागसंघाची भरारी

2 hours ago 1
चूल आणि मूल ही परंपरा मोडीत काढत बचत गटाच्या आधाराने सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील नारीशक्ती महिला प्रभाग संघाच्या महिला स्वावलंबी बनल्या आहेत. याठिकाणी ४६३ महिला गटांची स्थापना करण्यात आली असून बँकेच्या अर्थसाहाय्याने महिलांनी विविध व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येक महिन्याला शासकीय योजनेसंबंधी मिळणारे मार्गदर्शन व त्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे कौशल्य यामुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक गटाला दरवर्षी मिळणारे खेळते भांडवल बचत गटाला फायद्याचे ठरत आहे. ग्रामीण महिला स्वावलंबी व्हाव्यात, त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करावे या उद्देशाने शासन स्तरावरून बचत गटांना बळकटी देण्याचे काम अविरत सुरू आहे. ४६३ पैकी ४०० बचत गटांना तीस हजार रुपये खेळते भांडवल उपलब्ध झाले असून, २०० बचत गट बँकेच्या अर्थसाह य्यातून स्वयंपूर्ण झाले आहेत. प्रत्येक वर्षी महिला बचत गटाचा वाढता आलेख महिलांना रोजगार ाभिमुख दिशा देणारा आहे. प्रभाग संघाला जोडलेली १७ ग्रामसंघं अविरत काम करत आहेत. त्यामुळे पुढील काळात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रवीण शेषराव लोखंडे प्रभाग समन्वय शिवना यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याची प्रतिक्रिया या वेळी महिलांनी दिली. संघभाग स्वतंत्र विभाग म्हणून कार्यान्वित व्हावा ^प्रभाग संघाचे कार्य निरंतर आणि प्रभावी चालण्यासाठी हा विभाग कायमस्वरूपी शासनाचा स्वतंत्र विभाग म्हणून कार्यान्वित व्हावा, अशी प्रत्येक प्रभाग संघाची मागणी आहे. ज्यामुळे गरीब कुटुंबासाठी आणि त्यांच्या उपजीविकेसाठी प्रभावी कार्य करता येईल .-प्रवीण शेषराव लोखंडे, प्रभाग समन्वयक, शिवना या महिलांचे अविरत कार्य ^आशा जाधव(वाघेरा),कमल काळे,छाया देवकर,दैवशाला ढेपले,द्वारका काळे सर्व शिवना, संगीता जाधव (खुपटा) स्वाती साळवे डिग्रस, वर्षा चंडोल जळकी बाजार, पूनम जाधव धोत्रा, रुख्मन पडळकर पानवडोद, बु., मोनाली दांडगे पानवडोद खु., रोशनी खराटे, वडाळी, या प्रभाग संघ सदस्य व तबस्सुम पांडे प्रभाग संघ सचिव, कौशल्या चोरमारे प्रभाग संघ कोशाध्यक्ष या महिला घरोघरी जाऊन शासनाच्या विविध योजनेसंबंधी माहिती देतात. शासनाने अल्प दरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळे उपलब्ध करून घ्यावेत.- सुचेता काळे, अध्यक्ष, प्रभाग संघ, शिवना

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article