Published on
:
12 Oct 2024, 5:05 am
Updated on
:
12 Oct 2024, 5:05 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी विमान उत्पादक कंपनी बोईंग सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे बोईंग कंपनी तब्बल १७ हजार नोकरकपात करणार आहे. यामुळे त्यांना 777X जेटची पहिली डिलिव्हरी देण्यास एका वर्षाचा विलंब होण्याची शक्यता आहे. बोईंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या महिनाभर चाललेल्या संपामुळे कंपनीच्या विमान उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परिणामी कंपनीला तिसऱ्या तिमाहीत ५ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे.
बोईंगचे सीईओ केली ऑर्टबर्ग (Kelly Ortberg) यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, ३३ हजार यूएस वेस्ट कोस्ट कर्मचारी संपावर गेल्याने कंपनीने 737 MAX, 767 आणि 777 जेट्सचे उत्पादन बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कर्मचारी कपात करावी लागेल.