वाहतूक मार्गात बदलpudhari news
Published on
:
12 Oct 2024, 7:05 am
Updated on
:
12 Oct 2024, 7:05 am
मुंबई : दसरा मेळावा १२ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे आयोजित केला आहे. मेळाव्यानिमित्त पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या दिवशी वाहतूक व्यवस्थापनामध्ये सकाळी ९ ते रात्री १२ वा. च्या दरम्यान बदल करण्यात आला आहे.
अ) वाहने पार्क करण्यास प्रतिबंध असलेले रस्तेः
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकरमार्ग, एल.जे. रोड
ब) वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्गः
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग पर्यायी मार्ग : सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत. पर्यायी मार्ग एल. जे. रोड, गोखले रोड स्टिलमॅन जंक्शनवरून पढे गोखले रोडचा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन द. वाहीनी. पर्यायी मार्ग : राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. पर्यायी मार्ग : गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर. एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.
क) आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणारे मार्ग
१. बाळगोविंद दास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासुन पश्चिम दिशेला एल.जे. मार्गापर्यंत. पर्यायी मार्ग: मनोरमा नगरकर मार्गाचा वापर करतील.
२. दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथुन गडकरी जंक्शनपर्यंत. पर्यायी मार्ग एल. जे. रोड, गोखले रोड, रानडे रोडचा वापर करतील.